भाजपच्या आमदार पंकजा मुंडे-पालवे यांच्या संघर्ष यात्रेचे उद्या (दि. १४) त्यांचे सातारा जिल्ह्यातील नायगाव (ता. खंडाळा) येथे आगमन होणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष भरत पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
पाटील म्हणाले, १९९५च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी गोपीनाथ मुंडे यांनी संघर्ष यात्रा काढली होती व तिला मोठा प्रतिसादही मिळाला होता. मात्र त्यांच्या अकाली निधनाने पक्षाला त्यांची कमतरता भासत आहे. तसेच त्यांचा आधार गेल्यामुळे अनेक जण हतबल झाले आहेत. त्यासाठीच पंकजा मुंडे यांनी ही यात्रा सुरू केली आहे. जेव्हा मुंडे यांनी संघर्ष यात्रा काढली होती तेव्हा राजकारणातील गुन्हेगारीचा प्रमुख मुद्दा होता. आज मात्र सिंचन घोटाळा, धरणाचे अनेक घोटाळे, भ्रष्टाचार यासह वेगवेगळे गरप्रकार उघडकीस आले आहेत. सातारा जिल्ह्यात कायम दुष्काळग्रस्त असलेले माण, खटाव येथे अद्यापही पाणीप्रश्न आहेच. या अशा अनेक मुद्यांवर आ. पंकजा मुंडे प्रकाशझोत टाकणार आहेत. सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी अर्थात नायगाव येथे ही यात्रा येणार आहे. तेथे सकाळी ११ वाजता सभा होईल. त्यानंतर लोणंद माग्रे फलटण येथे दुपारी ३ वाजता नाना पाटील चौकात सभा होईल. त्यानंतर संध्याकाळी दहीवडीत जाहीर सभा होईल. शिखर िशगणापूर येथे संध्याकाळी ही यात्रा पोहोचेल. या यात्रेत पंकजा मुंडेंसमवेत पक्षाचे सरचिटणीस सुजितसिंग ठाकूर, आ. चंद्रकांत पाटील, खा. संजयकाका पाटील हे सहभागी असल्याचे भरत पाटील यांनी नमूद केले.
या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते दिलीप येळगावकर, नगरसेविका सुवर्णा पाटील तसेच विलास आंबेकर उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा