सांगली : सांगली-आष्टा मार्गावर दुचाकीवरून तलवारी विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला सांगली शहर पोलिसांनी अटक करून १० तलवारी हस्तगत केल्या. त्याला अधिक चौकशीसाठी न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा – राज्यकर्ते आरक्षणाच्या प्रश्नांवर गंभीर नाहीत – खासदार सुप्रिया सुळे

हेही वाचा – उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते… अमित शाहांची टीका

कृष्णा नदीलगत एक व्यक्ती संशयास्पदरित्या वावरत असल्याची माहिती सांगली शहर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे भगतसिंग विक्रमसिंग शिख (वय २१ रा. जुना कुपवाड रोड) याला ताब्यात घेऊन झडती घेतली. त्याच्याजवळील दुचाकीवर असलेल्या काळ्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या तलवारींची विक्री करण्याच्या प्रयत्नात तो होता. या तलवारींची किंमत ६५ हजार रुपये आहे. या तलवारी कोठून आणल्या, व कोणाला विकणार होता याची माहिती घेण्यासाठी त्याला न्यायालयात हजर करून पोलीस कस्टडीची मागणी पोलिसांच्यावतीने करण्यात आली. न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.