अखेरच्या क्षणापर्यंत बंडखोरी टाळण्याचे काँग्रेस नेत्यांचे प्रयत्न असफल ठरल्याने सांगली लोकसभेसाठी काँग्रेसचे प्रतीक पाटील यांना महायुतीच्या उमेदवाराबरोबरच पक्षाचे माजी आमदार हाफिज धत्तुरे यांच्याशी लढत द्यावी लागणार असल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. दुसऱ्या बाजूला भाजपा नेत्यांनी माजी उपाध्यक्ष संगमेश तेली यांची बंडखोरी टाळण्यात यश मिळविले. सांगलीत आता िरगणात १७ उमेदवार उरले आहेत.
निवडणूक िरगणातून काँग्रेसचे माजी आमदार हाफिज धत्तुरे यांनी माघार घ्यावी यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम क्षणापर्यंत प्रयत्न सुरू होते. पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी पुण्यातील विश्वजित कदम यांच्या प्रचाराचे काम अर्धवट सोडून सांगलीला धाव घेतली. त्यांच्यासोबत श्री. धत्तुरे यांची समजूत काढण्यासाठी आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा खास निरोप घेऊन सांगलीस आलेल्या सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा संपर्कही धत्तुरे यांनी टाळला. भ्रमणध्वनीवर ते अखेपर्यंत संपर्क क्षेत्राच्या बाहेरच राहिले. त्यामुळे त्यांची उमेदवारी कायम राहिली.
ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत बठक घेऊन आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचे आदेश दिले. राष्ट्रवादीतून दाखल झालेली उमेदवारी मागे घ्यावी यासाठी माजी महापौर मनुद्दीन बागवान व शिक्षण मंडळाचे माजी सभापती इब्राहिम चौधरी यांना प्रयत्न करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार राष्ट्रवादीचे नगरसेवक अल्लाउद्दीन काझी, माजी नगरसेवक जमील बागवान व सज्जाद भोकरे यांनी आपले उमेदवारी अर्ज आज मागे घेतले.
उमेदवारी अर्ज माघार घेण्यास अवघी दहा मिनिटे उरलेली असताना भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष संगमेश तेली यांनी दीपक िशदे यांच्यासोबत येऊन आपली उमेदवारी मागे घेतली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी २७ पकी १० जणांनी माघार घेतली. माघार घेणाऱ्यांमध्ये शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब कुलकर्णी यांचाही समावेश आहे. निवडणूक िरगणात काँग्रेस महायुतीसोबतच अपक्ष श्री. धत्तुरे, बहुजन मुक्ती मोर्चाचे माजी महापौर नितीन सावगावे, तिसऱ्या आघाडीचे के.डी. िशदे आदींसह १७ उमेदवार िरगणात उरले आहेत. यामध्ये पौर्णिमा कोरपाळे या विद्यार्थिनीसह तीन महिला आहेत.
बंडखोरीमागे षडयंत्र
काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांमध्ये फूट पाडण्याचे षड्यंत्र हाफिज धत्तुरे यांच्या उमेदवारी मागे असल्याचा आरोप सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मिरज तालुक्यातील कळंबी येथे झालेल्या प्रचारसभेत केला. तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना श्री. पाटील म्हणाले की, मार्केटिंग करून विकासाचे मॉडेल सिद्ध करता येत नाही. आजही सर्वच आघाडीवर महाराष्ट्र अग्रेसर असून याबाबत जाहीर चच्रेस यावे असे सांगितले. राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी एक दिलाने काम करीत असल्याने चांगले यश मिळेल. स्थानिक पातळीवर आघाडीमध्ये काही प्रमाणात नाराजी असली तरी ती दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Story img Loader