सांंगली : विवाहित तरुणीला जबरदस्तीने मोटारीतून पळवून अत्याचार करण्यात आल्याची तक्रार एका पीडितेने तासगाव पोलीस ठाण्यात दाखल केली असून, याप्रकरणी दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीला राहत्या घरासमोरून जबरदस्तीने मोटारीत बसवून नेण्यात आले. यानंतर तिला मळणगाव (ता. कवठेमहांकाळ) आणि बेळगाव येथे नेऊन अत्याचार करण्यात आले. तसेच ज्या ठिकाणी ठेवण्यात आले होते, तेथून जाण्याचा प्रयत्न केला, तर तुकडे तुकडे करण्याची धमकीही देण्यात आली होती. तसेच पती व मुलांना जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली.

हेही वाचा – गणरायाच्या स्वागतासाठी सांगली नगरी सज्ज; गणेशमूर्ती, पूजासाहित्य, सजावटीचे साहित्य खरेदीसाठी गर्दी

हेही वाचा – CM Ekath Shinde : एकनाथ शिंदे महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नाहीत? स्वतःच उत्तर देताना म्हणाले…

याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात पीडितेने गुरुवारी रात्री उशिरा तक्रार दाखल केली. यानंतर उपअधीक्षक सचिन थोरबोले यांनी पीडितेच्या घराजवळ जाऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. याप्रकरणी संशयित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या मोटारीचा आणि चालकासह संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.