सांगली : महापालिका शाळेतील सव्वापाच हजार मुलांचा अध्ययन स्तर सुधारण्यासाठी शिक्षण विभागाने ९० दिवसांचा कृती कार्यक्रम हाती घेतला असून, भाषा व गणित विषयासाठी अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरत असल्याचे प्रशासन अधिकारी रंगराव आठवले यांनी सांगितले.

महापालिका क्षेत्रातील महापालिकेच्यावतीने चालविण्यात येत असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या घटत आहे. या शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ताही कमी होत असल्याचे दिसून आल्यानंतर महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी मागे राहणारे विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबविण्याची सूचना केली. या सूचनेनुसार ९० दिवसांचा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.

Attack on doctor at Miraj, Miraj hospital,
सांगली : मिरजेत डॉक्टरवर हल्ला, रुग्णालयाची मोडतोड; घटनेचा निषेध, कारवाईची मागणी
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Amit Thackeray on Eknath Shinde
Amit Thackeray : “धनुष्यबाण आणि पक्षनाव घेऊन एकनाथ शिंदेंनी चूक केली”, शिवसेनेतील बंडखोरीवरील अमित ठाकरेंची प्रतिक्रिया चर्चेत!
china leftover men reason
‘या’ देशात लग्नासाठी मुलांना मुलीच मिळेनात; ३.५ कोटी मुलांवर एकटे राहण्याची वेळ? कारण काय?
solapur got five guardian ministers
सोलापूरला चार वर्षात लाभले पाच पालकमंत्री 
Beautiful dance performance by barkat arora
‘हिच्या डान्सपुढे हिरोईनही पडेल फिकी…’; बघाल तर बघतच राहाल चिमुकलीचा डान्स; पाहा VIDEO
अंगावर दगड, शेण झेलून सावित्रीबाई फुलेंनी वाड्या-वस्त्यांवरील मुलींना कसं शिक्षण दिलं? (फोटो सौजन्य लोकसत्ता टीम)
सावित्रीबाई फुले यांनी अंगावर दगड, शेण झेलून मुलींसाठी शिक्षणाची दारं कशी उघडली?
rinku rajguru asha movie selcted for film festival
रिंकू राजगुरूच्या ‘या’ सिनेमाची ‘थर्ड आय एशियन चित्रपट महोत्सवात’ झाली निवड, पोस्ट करत म्हणाली…

हेही वाचा – उजनीतून एप्रिलपर्यंत शेतीसाठी पाण्याची तीन आवर्तने, पहिल्या आवर्तनासाठी १४.१७ पीएमसी पाणी

विद्यार्थ्यांमध्ये गणित व भाषा विषयक जाणीव कमी असल्याचे पडताळणीत आढळून आल्याने या विषयावरच भर देण्यात आला आहे. अभ्यासात प्रगती न दिसणारे विद्यार्थ्यांसाठी विशेष लक्ष देऊन त्यांची अध्ययनात प्रगती करवून घेण्यात येत आहे. यासाठी शिक्षकांकडून जाणीवपूर्वक अध्ययन केले जात असून, विद्यार्थ्यांच्या आकलनात प्रगती होत आहे की नाही, याची पडताळणी चाचणी परीक्षेद्वारे करण्यात येत आहे.

महापालिका शाळांमधील सर्वच विद्यार्थ्यांचा गुणात्मक दर्जा व सर्वांगीण विकास करून एनईपी २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करणे, अध्ययनस्तर वाढविण्यासाठी प्रोजेक्ट समय हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

हेही वाचा – उजनी धरणातील गाळ काढण्याचा निर्णय तज्ज्ञांच्या अहवालानंतर, जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांचे स्पष्टीकरण

इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व मुलांची पूर्व चाचणी ऑगस्टमध्ये घेण्यात आली. यामधून विद्यार्थ्यांची सद्यस्थिती काय आहे, याची माहिती उपलब्ध करून घेण्यात आली होती. इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर निश्चित करण्याबाबत महापालिका शिक्षण विभाग व डाएट सांगली, केंद्रसमन्वयक व अनुभवी शिक्षक यांच्याशी चर्चा करून सदर कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.

Story img Loader