सांगली : जिल्ह्यात सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बुधवारी रात्री पोलिसांनी गुन्हेगारांच्या घेतलेल्या झाडाझडतीत फरार, विविध गुन्ह्यांत हवे असलेले आणि अजामीनपात्र वॉरंट घेण्यास टाळणाऱ्या ६० जणांवर कारवाई करण्यात आली. तर १५१ वाहन चालकांवर कारवाई करत १ लाख ४० हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशान्वये सर्व पोलीस ठाणे हद्दीमध्ये बुधवारी रात्री ११ वाजल्यापासून आज पहाटे ३ वाजेपर्यंत नाकाबंदी, कोम्बिंग व ऑल आऊट ऑपरेशनचे आयोजन करण्यात आले होते. सदर कारवाई दरम्यान आर्म ॲक्ट, पाहिजे व फरारी आरोपी अजामीनपात्र वॉरट, तडीपार आरोपीवर कारवाई, रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणी करण्यात आली. मोहिमेमध्ये सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व शाखाचे अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून कारवाई करण्यात आली. कारवाईसाठी ४२ पोलीस अधिकारी, २१९ पोलीस अंमलदारांची नेमणूक करण्यात आली होती.

हेही वाचा – Eknath Shinde : “तुमचा तुरुंगात पाठवायचा चौथा नंबर होता”, विधानसभेत एकनाथ शिंदे फडणवीसांना काय म्हणाले?

हेही वाचा – Maharashtra MLC Election Result: विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील पराभूत; नेमकी कुणाची मतं कुणाकडे गेली?

या मोहिमेत पाहिजे असणारे, फरारी आरोपी ८, अजामीनपात्र वॉरटमधील आरोपी ४४ अशा ६० गुन्हेगारांना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली. तसेच ४ अवैध धंद्यावर कारवाई करण्यात आली असून ८६ रेकॉर्डवरील आरोपी तपासले आहेत. २ तडीपार इसमांवर कारवाई करण्यात आली. नाकाबंदीदरम्यान मोटार वाहन कायद्यान्वये १५१ कारवाई करुन १ लाख ३९,५५० रुपये दंड आकारण्यात आला.