सांगली : दीड वर्षाच्या मुलीवर वेळेत उपचार झाले नाहीत असे म्हणत मिरजेतील एका प्रथितयश डॉक्टरवर हल्ला करून रुग्णालयात तोडफोड करण्याचा प्रकार रात्री घडला आहे. याप्रकरणी संबंधिताविरुद्ध शुक्रवारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, इंडियन मेडिकल असोसिएशन मिरजने या घटनेचा निषेध करत कठोर कारवाईची मागणी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – उजनीतून एप्रिलपर्यंत शेतीसाठी पाण्याची तीन आवर्तने, पहिल्या आवर्तनासाठी १४.१७ पीएमसी पाणी

हेही वाचा – सांगली : पालिका शाळेतील मुलांचा अध्ययन स्तर सुधारण्यासाठी सांगलीत कृती कार्यक्रम

याबाबत माहिती अशी की, मिरजेतील डॉ. प्रकाश आमणापुरे यांच्या रुग्णालयात गुरुवारी रात्री एका दीड वर्षाच्या मुलीला उपचारासाठी आणण्यात आले होते. तपासणीसाठी डॉक्टर लवकर आले नाहीत, वेळेत उपचार होत नाहीत या कारणावरून नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी तोडफोड करत डॉ. आमणापुरे यांना शिवीगाळ आणि मारहाण केली. दरम्यान, उपचार करण्यापूर्वीच मुलीचा मृत्यू झाला. डॉक्टरांना मारहाण आणि तोडफोडीमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली असून, शुक्रवारी हा प्रकार सर्वांच्या समोर आला. आज याप्रकरणी संबंधित संशयितांविरुद्ध डॉ. आमणापुरे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा आयएमएचे अध्यक्ष डॉ. रविकांत पाटील यांनी निषेध केला असून, दोषींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sangli attack on doctor at miraj the wreckage of the hospital protest against the incident demand for action ssb