सांगली : सांगलीतील निर्धार फौंडेशनच्या सलग दोन हजार दिवस सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली असून सलग स्वच्छता मोहिमेची नोंद इंडियाज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. निर्धार फौंडेशनचे अध्यक्ष राकेश दड्डणावर व त्यांचे सहकारी सलग दोन हजार दिवस सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता मोहिम राबवत आहेत. १ मे २०१८ रोजी या मोहिमेचा प्रारंभ २५ तरूणांच्या मदतीने सुरू करण्यात आला. शनिवारी धामणी चौकात स्वच्छता मोहिमेचा २ हजारावा दिवस होता. याची नोंद विश्‍वविक्रमासाठी करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : पक्षवाढीसाठी कोणाशीही कोणताही वाद नाही – रामराजे नाईक निंबाळकर

हेही वाचा : “हलक्या मनाचे, कुचक्या वृत्तीचे, आतल्या गाठीचे अन्…”, शिंदे गटातील नेत्याची उद्धव ठाकरेंवर टीका

या मोहिमेचे सूत्रधार दड्डणावर यानी विक्रमाबाबत बोलताना सांगितले, ही सांगलीकरांसाठी अभिमानास्पद कामगिरी आहे. सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता व त्यानंतर सुशोभीकरण यामुळे या मोहिमेत तरूणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. कोणत्याही शासकीय मदतीशिवाय फक्त समाजातील दानशूर व्यक्तींकडून वस्तू स्वरूपात घेतलेल्या मदतीच्या माध्यमातून ही मोहीम सुरू आहे. सेल्फी पाँइंट, पंढरपूर वारी काळातील काम आणि महापूर ओसरल्यानंतरची स्वच्छता आदिंमुळे खर्‍या अर्थाने ही मोहीम सुरू केल्याचं समाधान मिळाले. जागतिक विक्रमाची नोंद झाली असली तरी नागरिकांच्या मनामध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती होऊन परिवर्तन घडणं आमचे अंतिम ध्येय आहे. यावेळी भारत जाधव, सतिश कट्टीमणी, अनिरुद्ध कुंभार, मानस शंभू, मनोज नाटेकर आदींसह स्वच्छतादूत उपस्थित होते.