सांगली : महापालिकेच्यावतीने शनिवारी राबविण्यात आलेल्या महास्वच्छता अभियानात सांगली, मिरज या मुख्य रस्त्यावरील सुमारे ४ टन कचरा संकलित करण्यात आला. यामध्ये महापालिकेच्या बाराशे कर्मचाऱ्यांसह सामाजिक संस्थाचे कार्यकर्ते, मिरजेतील बापूजी साळुंखे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थीही सहभागी झाले होते.

महापालिकेचे आयुक्त श्री. गुप्ता यांच्या उपस्थितीत पुष्पराज चौक कर्मवीर भाऊराव चौक ते मिरज महात्मा गांधी पुतळा हा सुमारे ९ किलोमीटर मार्गावर महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये महापालिकेच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांसह विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते या अभियनात सक्रिय सहभागी झाले. या अभियानात सुमारे ४ टन कचरा संकलित करण्यात आला.

महापालिकेच्या वतीने यापुढे देखील असे महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. शहरातील सर्व सेवाभावी व सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांनी स्वच्छता मोहिमेमध्ये आपला सहभाग नोंदवून आपले शहर स्वच्छ करण्यासाठी आपला हातभार लावावा असे आवाहन आयुक्त गुप्ता यांनी केले.