सांगली लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्याप कायम असून महाविकास आघाडीमध्ये ही जागा नेमकी कुणाला जाणार? याविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. एकीकडे ठाकरे गटाकडून खुद्द उद्धव ठाकरेंनी सांगलीतून उमेदवाराच्या नावाची घोषणा केली असताना दुसरीकडे काँग्रेसमध्ये विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांच्यासाठी हा मुद्दा प्रतिष्ठेचा झाला आहे. मंगळवारी महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार असून त्यात अंतिम जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील यांनी पत्रकार परिषदेत ठाम भूमिका मांडली आहे.

निवडणूक लढवण्यावर विशाल पाटील ठाम

सांगलीची जागा काँग्रेसकडेच जाईल, या खात्रीवर पक्षाकडून विशाल पाटील यांनी मतदारसंघात कामाला सुरुवात केली होती. मात्र, उद्धव ठाकरेंनी जागावाटप जाहीर होण्याआधीच माजी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या नावाची ठाकरे गटाकडून सांगलीसाठी घोषणा केली. त्यामुळे सांगलीवरून ठाकरे गट व काँग्रेस यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुंदोपसुंदी चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच संजय राऊत व नाना पटोले यांच्यात या जागेवरून दावे-प्रतिदावेही रंगताना दिसून आलं.

BJP MP Ashok Chavan
Ashok Chavan : “राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम तेव्हा झाला”, अशोक चव्हाणांचं मोठं विधान; म्हणाले, “काँग्रेस…”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Raghav Chadha Delhi Election Result 2025
Raghav Chadha : ‘आप’चं संस्थान खालसा होत असताना राघव चढ्ढा कुठे होते? अनुपस्थितीत असल्याने चर्चांना उधाण
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना; कारण काय?
Devendra Fadnavis to Inaugurate TJD Deccan Summit 2025
ठाकरे, पवारांचे आधीच ठरले होते, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे वक्तव्य !
Shivsena MLA Arjun Khotkar
Arjun Khotkar : “राजकीय भूकंप काय असतो हे आम्ही दाखवून देऊ”, अर्जुन खोतकरांचं मोठं विधान; कोणाला दिला इशारा?
What Jitendra Awhad Said?
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांचा टोला, “…तर धनंजय मुंडे आधुनिक तुकाराम महाराज होऊ शकतात”
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”

मंगळवारी महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत आघाडीचं अंतिम जागावाटप जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विशाल पाटील यांनी ही जागा काँग्रेसलाच मिळावी, असा आग्रह कायम ठेवला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत विशाल पाटील यांनी संजय राऊतांच्या विधानांवर नाराजीही व्यक्त केली आहे.

“काँग्रेसनं विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांचा विचार घेऊन माझ्या नावावर निर्णय घेतला. पण हा जागावाटपाचा तिढा अनपेक्षितपणे समोर आला. तरी ही जागा कुणी का मागितली या वादात न पडता आमच्या पक्षाच्या नेत्यांनी संयम पाळला. आम्ही कोणतंही वक्तव्य केलं नाही”, असं विशाल पाटील यांनी नमूद केलं.

“आमच्या मनात खंत”

“संजय राऊतांना सांगलीकरांनी आवाज दिला. पण तोच आवाज सांगलीकरांच्या विरोधात सांगलीत वापरला गेला. त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या मनात थोडी खंत जाणवते आहे. इथे दुसरा कोणता विषय चर्चेचा नाही. त्यांनी विश्वजीत कदम यांच्याबाबत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे काही विधानं केली. विश्वजीत कदम सांगलीच्या प्रत्येक व्यक्तीचं म्हणणं मांडत होते. अशावेळी त्यांच्याविषयी संशय घेऊन काहीतरी भूमिका मांडणं हे युती धर्माला शोभेसं नाही. विश्वजीत कदम कुठल्यातरी पक्षात जाणार आहेत असं कुणीतरी बोलणं चुकीचं आहे. ते आमच्या पक्षाचे स्टार प्रचारक आहेत”, अशा शब्दांत विशाल पाटील यांनी संजय राऊतांवरची नाराजी बोलून दाखवली.

विश्वजित, विशाल पाटील आमचेच, नाराजी दूर होईल – संजय राऊत

“आम्हाला शिवसेना पक्षाबाबत, उद्धव ठाकरेंबाबत, त्यांच्या कुटुंबीयांबाबत, संजय राऊतांबाबतही आदर आहे. पण ते असं का बोलले? हा सांगलीचा विषय बंद खोलीत चालायला हवा होता. तो बाहेर आला म्हणून विश्वजीत कदम यांनी जागा आमची आहे ही भूमिका मांडली. रोज हा मुद्दा खूप ताणला गेला. उद्या कदाचित उमेदवारी ऐनवेळी जाहीर होईल”, अशी शक्यता विशाल पाटील यांनी व्यक्त केली.

“संजय राऊतांनी सांगलीत यायचं कारण काय?”

“सांगलीबाबत निर्णय व्हायच्या आधी सांगलीत यायचं कारण काय? देशात निवडणूक जाहीर झालेली असताना संजय राऊतांनी २-३ दिवस इथे येऊन का वाया घालवावेत हा आमच्यासमोरचा प्रश्न आहे. कदाचित या काळात त्यांना अंदाज आला असेल की सांगलीत परिस्थिती नेमकी काय आहे. त्यामुळे त्यांच्या हट्टात बदल झाला असेल अशी मी अपेक्षा करतो”, अशी खोचक टिप्पणीही विशाल पाटील यांनी केली.

“सांगलीत भाजपाचा पराभव निश्चित आहे हे आम्ही दाखवून दिलं आहे. या परिस्थितीत आघाडीत शिवसेनाच काय, इतर पक्षांनाही वाटणं स्वाभाविक आहे की काँग्रेसनं एवढं चांगलं रान पेटवलेलं असताना आपण आपला उमेदवार निवडून आणावा. त्यामुळे त्यांची मागणी आम्ही चूक समजत नाही”, असंही विशाल पाटील म्हणाले.

Story img Loader