सांगली : नात्यातील मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी कुंडल येथील नागेश हंबीरराव होवाळ (वय ३६) या आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा गुरुवारी ठोठावली.

आरोपी हा पीडितेच्या नातेसंबंधातील असून त्यांने अल्पवयीन पीडितेवर लैंगिक अत्याचार केले होते. ही बाब मुलगी आजारी पडल्याने रुग्णालयात तपासणीसाठी गेली असताना फेब्रुवारी २०१६ मध्ये समोर आली. यावेळी पीडिता सहा महिन्याची गरोदर होती. आरोपींने लैंगिक अत्याचार करीत असताना जीवे मारण्याची धमकी देऊन हा प्रकार केल्याचे पीडितेने सांगितले. खुनाची धमकी दिल्याने हा प्रकार तिने कोणालाही सांगितला नव्हता.
या प्रकरणी कुंडल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी
Mumbai High Court Verdict On Marriage Cruelty.
सुनेला टीव्ही पाहू न देणे ही क्रूरता? मुंबई उच्च न्यायालयातील खटला २० वर्षांनी निकाली
thane model code of conduct crime loksatta news
आचारसंहिता भरारी पथकाचीच खंडणीखोरी, शेतमालाच्या पैशांवर डल्ला, १३ दिवसांनंतर गुन्हा दाखल
Abdul sattar latest news in marathi
मंत्री सत्तार यांच्या संस्थेच्या २३ मुख्याध्यापकांविरुद्ध गुन्हा, निवडणूक कामात हलगर्जीपणा
abuse girl by delivery boy search for absconding accused is on
‘डिलिव्हरी बॉय’कडून मुलीशी अश्लील कृत्य; पसार झालेल्या आरोपीचा शोध सुरू

हेही वाचा – आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेणार का? उज्ज्वल निकम म्हणाले…

हेही वाचा – “कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊनच शिंदे गटाचं बंड”; सुप्रीम कोर्टातील युक्तिवादानंतर बच्चू कडूंची प्रतिक्रिया; म्हणाले, “उद्धव ठाकरेंच्या…”

पोलिसांनी तपास करून आरोपीविरुद्ध आरोपपत्र जिल्हा सत्र न्यायालयात सादर केले होते. न्या.डी. एस. हातरोटे यांच्यासमोर हा खटला चालविला गेला. न्यायालयात दहा साक्षीदार तपासण्यात आले. तसेच, न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेचा अहवाल सादर करण्यात आला. न्यायालयाने साक्ष व पुरावे ग्राह्य मानून आरोपी होवाळ याला दोषी ठरवून दहा वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणी सरकार पक्षाच्यावतीने आरती देशपांडे-साटविलकर यांनी काम पाहिले.