सांगली जिल्हा बेँकेचा एनपीए १० टक्क्यापर्यंत खालीआणण्यात प्रशासनाला यश आले असून संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये १५१ कोटींचा ढोबळ नफा झाला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष आ. मानसिंगराव नाईक यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली.
गेल्या वर्षी बँकेचा एनपीए १४.३४ टक्के होता, तो यंदा १०.३४ टयययापर्यंत आणण्यात यश आले असून येत्या दोन वर्षात बँकेचा नेट एनपीए शून्यावर आणण्याचा इरादा आहे. यंदा नेट एनपीए प्रमाण ४.५१ टयययापर्यंत खाली आणण्यात यश आल्याने बँक आर्थिक संकटातून बाहेर आणण्यात यश आले असल्याचेही आ. नाईक यांनी सांगितले.
हेही वाचा >>> चंद्रपूर: महावितरणला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार
बॅकेने ढोबळ नफ्यातून १७ कोटी रूपये थकित शेतकर्यांना एकरकमी परतफेड योजनेतून व्याजात सवलत देण्यासाठी वर्ग केले आहेत. नैसर्गिक संकटामुळे नादारी निर्माण झालेल्या शेतकर्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी एकरकमी परतफेड योजनेसाठी जून अखेर मुदतवाढ देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षी बॅकेचे उत्पन्न ५८९ कोटी ८३ लाख रूपये होते ते यंदा ३१ कोटी २२ लाखांनी वाढले आहे. ठेवीमध्ये १७ कोटी ७ लाखांनी वाढ झाली असून सध्या बँकेच्या ठेवी ६ हजार ९७० कोटींवर पोहचल्या आहेत. नफ्यातून अडचणीत असलेल्या विकास सोसायटींना मदत देण्याचा विचार असल्याचेही ते म्हणाले. बँकेने थकबाकी वसुलीला प्राधान्य दिल्याने ३५४ कोटीपैकी २६१ कोटींची वसुली झाली असून थकबाकी वसुलीचे प्रमाण ७३.७८ टक्के आहे. गतवर्षी हे प्रमाण ४७.५४ टक्के होते. ठेवीवर अर्धाटक्का व्याज वाढविण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याचेही आ. नाईक यांनी सांगितले. यावेळी बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, व्यवस्थापकिय संचालक शिवाजीराव वाघ हे उपस्थित होते.