सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पैशांसाठी मृत रुग्णाला जिवंत असल्याचं दाखवून एका डॉक्टरने दोन दिवस उपचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणावर संताप व्यक्त होत असून, भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनीही या घटनेवर संताप व्यक्त केला असून, ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मृत रुग्ण जिवंत असल्याचे दाखवून इस्लापूर येथील डॉ. वाठारकर याने मृतदेहावरच दोन दिवस उपचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारने खळबळ उडाली असून, वाठारकरला पोलिसांनी अटक केली आहे. अतुल भातखळकर यांनी या घटनेचा हवाला देत ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.

“पैशांसाठी २ दिवस मृत रुग्णावर उपचार करण्याची धक्कादायक घटना महाराष्ट्रात इस्लामपूर येथे घडली आहे. राज्यकर्तेच खंडणीखोर असेल, तर कोणाला कशाला भीती वाटेल. पैशाने राज्यकर्तेच विकत घेतले की सगळे प्रकरण मूळापासून मिटवता येईल, एव्हढा साधा हिशोब समाजकंटक करत आहेत,” अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.

हेही वाचा- पैशांसाठी दोन दिवस मृतदेहावर सुरु होते उपचार; महाराष्ट्रातील धक्कादायक घटना

काय आहे प्रकरण?

डॉ. योगेश रंगराव वाठारकर याचे शहरात बस स्थानकाजवळ माणकेश्वर चित्र मंदिर परिसरात आधार हेल्थ केअर नावाचे रुग्णालय आहे. या रुग्णालयामध्ये गेल्या दीड वर्षांपासून करोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. दरम्यान, २४ फेब्रुवारी रोजी सलीम शेख यांनी त्यांची आई सायरा (वय ६०) यांना उपचारासाठी आधार हेल्थ केअरमध्ये दाखल केलं होतं. तेथे डॉ. योगेश वाठारकर याने त्यांच्यावर उपचार सुरू केले. रुग्ण सायरा यांचा उपचारादरम्यान ८ मार्च रोजी सकाळी पावणे बारा वाजता मृत्यू झाला. ही माहिती डॉक्टरांनी मुलगा सलीम शेख यांच्यापासून लपवली आणि मृतदेहावर उपचार सुरूच ठेवले. मृत रुग्ण जिवंत असल्याचे भासवून मृतदेहावर दोन दिवस उपचार केले. याप्रकरणी डॉ. वाठारकर याच्यावर आर्थिक फसवणूक व मृतदेहाची विटंबना केल्याप्रकरणी इस्लामपूर अटक करण्यात आली आहे.