सांगली : कृष्णा कोयना नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. औदुंबर (ता. पलुस)  येथील श्री दत्त मंदीराच्या गाभाऱ्यात बुधवारी कृष्णामाईने प्रवेश केला. मंदिरातून देव बाहेर घेऊन जाण्याचा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी सकाळपासून गर्दी केली होती. त्यानंतर श्री दत्त देवाची पूजाअर्चना देवघरात सुरू झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – सोलापूर : करमाळ्यात माहेरी राहणाऱ्या पत्नीचा सुपारी देऊन खून, पतीसह सहाजण अटकेत

हेही वाचा – Shyam Manav : “सुपारी देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये…”, देवेंद्र फडणवीसांच्या वडिलांचा उल्लेख करून श्याम मानव यांचा पलटवार

कृष्णा नदी पात्रात पाणी वाढल्यामुळे नागठाणे बंधारा पाण्याखाली गेला आहे. मात्र, आमणापूर – अंकलखोप पूलावर वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. पाणी पातळी वाढत असल्यामुळे प्रवाशांनी माहिती घेऊनच प्रवास करावा. नागरिकांनी नदीकाठावर जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन पलुसचे तहसीलदार दिप्ती रिटे यांनी केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sangli entry of krisha river water into the core of datta temple in audumbar ssb
Show comments