सांगली : अनैतिक संंबंधातून विकास सोसायटीच्या माजी अध्यक्षाचा रविवारी भरदिवसा चाकूने भोकसून खून करण्याचा प्रकार कोसारी (ता. जत) येथे घडला. या खूनप्रकरणी दोन भावाना पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार कोसारी विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष शंकर आप्पाणा तोरवे (वय ५६) यांचा रविवारी दुपारी अडीच वाजता चाकूने भोकसून व लोखंडी नलिकेने मारहाण करून खून करण्यात आला. या खूनप्रकरणी संदीप महादेव नरूटे, संतोष महादेव नरूटे या दोन भावांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा – जान्हवी कपूरच्या चाहत्याने ‘मिस्टर ॲण्ड मिसेस माही’ चे १८ खेळ केले बूक

हेही वाचा – सांगली : वरातीपुढे नाचणाऱ्या तरुणाचा चाकूने भोकसून खून

मृत तोरवे याचा आणि संशयित आरोपींच्या नातलग महिलेचे अनैतिक संबंध असल्याचा राग होता. या रागातूनच हा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती चौकशीतून समोर आली आहे. तशी तक्रार जत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, मुलीच्या प्रकरणात सतिश अर्जुन कुंभार (वय २४ रा. कवठेएकंद ता. तासगाव) याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. कुंभार याला कवठेएकंद हायस्कूलजवळ असलेल्या पोल्ट्रीमध्ये बोलावून मुलीच्या प्रकरणात दम देत असताना त्याच्यावर अभिजित गुजले उर्फ बाळशा आणि वैभव या दोघांनी चाकूने वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.