मिरजेपासून वीस किलोमीटर अंतरावरील शिपूर गावातील एका उसाच्या फडात गांजा पिकवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आज (शुक्रवार) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने उघडकीस आणला. या ३० गुंठे क्षेत्र असलेल्या उसाच्या पिकातून लाखो रूपयांचा गांजा जप्त करण्यात आला असून, संबंधित शेतकर्‍यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शिपूर ते खंडेराजुरी मार्गावरील म्हैसाळ योजनेच्या शाखा कालव्यानजीक गांजाची लागवड करण्यात आली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीनुसार मिरज ग्रामीण पोलीसांच्या मदतीने उत्पादन शुल्क विभागाच अधीक्षक संध्या देशमुख यांनी छापा टाकला असता गांजा लागवड आढळून आली.

चौकशीसाठी शेतकरी ताब्यात –

उसाच्या फडामध्ये चार ते पाच फुटावर गांजाची झाडे लावण्यात आली होती. पाउण एकराच्या रानात चार ते सहा फूट उंच वाढलेली साडेचारशेहून अधिक गांजाची झाडे पथकाने जप्त केली. याचे वजन आणि मोजदाद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. जप्त करण्यात आलेल्या गांजाचे मुल्य ५० लाखांहून अधिक असल्याचे सांगण्यात आले. मात्र वजन केल्यानंतरच जप्त गांजाचे निश्‍चित मूल्य सांगता येईल, असे देशमुख यांनी सांगितले. या प्रकरणी शेतकरी नंदकुमार दिनकर बाबर यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.