सांंगली : सातत्याने होत असलेल्या छेडछाडीतून एका महाविद्यायीन युवतीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार खंडेराजुरी (ता. मिरज) येथे घडला. या प्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा संशयित साहील बबन डफेदार याच्याविरुध्द दाखल करण्यात आली आहे.

महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीने दि. १७ ऑगस्ट रोजी विषारी औषध प्राशन केले. तिला अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर मुलीच्या वडिलांनी मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी साहील बबन डफेदार (वय २१) याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुरुवारी तक्रार दिली. संशयित तरुणाकडून वारंवार मुलीची छेड काढली जात होती. बसस्थानक परिसरात मुलीच्या मागे फिरत होता. याबाबत संशयिताच्या पालकांना याबाबत सांगून ताकीद देण्यात आली होती. मात्र, काही दिवसांनी परत त्रास देऊ लागला. यामुळे मानसिक त्रास दिल्याने मुलीने आत्महत्या केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी संशयित तरुणाविरुद्ध गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.

Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
10th student commits suicide before pre-examination
पूर्वपरीक्षेपूर्वी दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
A young man attempted suicide from the employees building in the Police Commissionerate area
पोलिस आयुक्तालय परिसरातील कर्मचाऱ्यांच्या इमारतीवरून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास

हेही वाचा – Maharashtra Rain News: राज्यात गेल्या अडीच महिन्यांत पाऊस नेमका किती ? हवामान विभाग काय म्हणतोय…

हेही वाचा – उद्याच्या महाराष्ट्र बंदला उच्च न्यायालयात आव्हान

दरम्यान, भाजप सांस्कृतिक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष ओंकार शुक्ल यांनी कार्यकर्त्यांसह याबाबत उपअधिक्षक गिल्डा यांची भेट घेऊन सदरचा प्रकार लव्ह जिहादमधील असून जाणीवपूर्वक मुलीला त्रास दिला गेला असल्याचे दिसून येत असल्याने संशयिताविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या प्रकरणी चौकशीत स्पष्ट झाल्यानंतर कठोर कारवाई करण्यात येईल, असे भाजप कार्यकर्त्यांना उपअधिक्षक गिल्डा यांनी आश्‍वासन दिले.