सांगली : महापूराची धास्ती मनात असताना नदीतील पाणी पातळीबाबतची माहिती देत असताना महापालिकेच्या अधिकार्‍यांचा गलथान कारभार गुरूवारी समोर आला. या प्रकाराची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात येईल असे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सतत पडत असलेला पाउस आणि धरणातून सोडण्यात आलेले पाणी यामुळे महापूराचे संकट वेशीवर आले असताना लोकांना सजग करण्यासाठी आणि अद्यावत माहिती देण्यासाठी महापालिकेने २४ तास कार्यरत वॉररूम कार्यरत केली आहे. या ठिकाणाहून महापालिकेच्या जनसंपर्क विभागाकडून माध्यमांना वेगवेगळ्या ठिकाणची पाणीपातळी तासा-तासाला कळविण्यात येते. मात्र, पहाटे पाच वाजेपर्यंंत मिरजेतील कृष्णाघाट येथे इशारा पातळी ४५ फूट असल्याचे सांगण्यात येत होते. अचानकपणे पहाटे पाच वाजता इशारा पातळी ४८ फूट असल्याचे सांगण्यात आले. यामुळे गोंधळ माजला. याबाबत विचारणा होताच सकाळी आठनंतर पुन्हा इशारा पातळी ४५ फूट असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा : Koyna Dam: कोयनेचे दरवाजे दीड फुटांवर, पाणलोटात १२.३० इंच पाऊस; सांगली, कोल्हापूर महापुराच्या उंबरठ्यावर

Rain Maharashtra, Rain in Diwali, Rain,
फटाक्यांच्या मोसमात पावसाची आतषबाजी, महाराष्ट्रात पुन्हा…
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
vehicle got stuck on the railway track due to gravel stone at mothagaon village in dombivli
डोंबिवली मोठागाव रेल्वे फाटकात खडी टाकल्याने वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले, दुचाकी स्वारांची सर्वाधिक अडचण
Jewellery worth more than three lakh rupees seized from suspected vehicles in Bhiwandi
भिवंडीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई, संशयित वाहनांतून तीन लाखाहून अधिक रुपयांचे दागिने जप्त
is Dissatisfaction in North Gadchiroli over Sohle Iron Mine
सोहले लोहखाणीवरून उत्तर गडचिरोलीत असंतोष? खाणीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याला…
A decision to examine scholars in the city pune Municipal Commissioner order to fire brigade
शहरातील अभ्यासिकांची तपासणी करण्याचा मोठा निर्णय, नक्की कारण काय ? महापालिका आयुक्तांचा अग्निशमन दलाला आदेश
Pimpri  Municipal Corporation warns of action against unlicensed firecracker stalls Pune print news
पिंपरी: विनापरवाना फटाका स्टॉलवर महापालिकेची नजर
Sassoon Hospital exceeds capacity facing burden of forensic cases steps are being taken to reduce it
‘ससून’वरील ताण कमी होणार! अतिरिक्त पोलीस आयुक्तांचे वानवडी, हडपसर पोलिसांना आदेश

या माहितीच्या या गोंधळाबाबत पालकमंत्री खाडे यांना विचारले असता असे होणार नाही, मात्र याची चौकशी केली जाईल, या गोंधळाला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे सांगितले. दरम्यान, महापूराच्या काळात वाहून जाणारे पाण्याने दुष्काळी भागातील तलाव भरून घेण्यासाठी ताकारी, म्हैसाळ, टेंभू या सिंचना योजना चालू करण्याचे आदेश देण्यात आल्याचे पालकमंत्री खाडे यांनी सांगितले. या योजनेतून कवठेमहांकाळ, तासगाव, आटपाडी, खानापूर, जत, सांगोला, मंगळवेढा या तालुययातील साठवण तलाव भरून घेण्यात येतील असेही ते म्हणाले.