सांगली : महापूराची धास्ती मनात असताना नदीतील पाणी पातळीबाबतची माहिती देत असताना महापालिकेच्या अधिकार्यांचा गलथान कारभार गुरूवारी समोर आला. या प्रकाराची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात येईल असे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सतत पडत असलेला पाउस आणि धरणातून सोडण्यात आलेले पाणी यामुळे महापूराचे संकट वेशीवर आले असताना लोकांना सजग करण्यासाठी आणि अद्यावत माहिती देण्यासाठी महापालिकेने २४ तास कार्यरत वॉररूम कार्यरत केली आहे. या ठिकाणाहून महापालिकेच्या जनसंपर्क विभागाकडून माध्यमांना वेगवेगळ्या ठिकाणची पाणीपातळी तासा-तासाला कळविण्यात येते. मात्र, पहाटे पाच वाजेपर्यंंत मिरजेतील कृष्णाघाट येथे इशारा पातळी ४५ फूट असल्याचे सांगण्यात येत होते. अचानकपणे पहाटे पाच वाजता इशारा पातळी ४८ फूट असल्याचे सांगण्यात आले. यामुळे गोंधळ माजला. याबाबत विचारणा होताच सकाळी आठनंतर पुन्हा इशारा पातळी ४५ फूट असल्याचे सांगण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा