सांगली : स्थानिक विरुद्ध बाहेरील या वादात भाजपचे विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांच्या जत विधानसभा निवडणूक लढविण्याच्या मनसुब्यांना खीळ बसत आहे. त्यांचे रहिवासी गाव आटपाडी तालुक्यातील आणि विधान परिषदेचे आमदार असताना पक्षाच्या अन्य कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना स्थानिक पातळीवर व्यक्त होत असून यातूनच रविवारी आमदार पडळकर आणि विधानसभा प्रचारप्रमुख तमणगोंडा रविपाटील यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला.

पडळकर यांनी २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप सोडून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीवर लोकसभा निवडणूक लढवली होती. या वेळी त्यांना जतमधून मोठे मतदान झाले होते. हे मताधिक्य आणि या मतदारसंघात मोठ्या संख्येने असलेल्या धनगर समाजावर लक्ष केंद्रित करत आमदार पडळकर यांनी गेल्या दोन वर्षांपासून जतमधून निवडणूक लढण्याची तयारी सुरू आहे. यातून विधान परिषदेत त्यांनी जतच्या प्रश्नासाठी आक्रमक भूमिका घेतली. तालुक्यातील विकास कामासाठी मोठा निधीही मंजूर केला. गेल्या एक वर्षापासून गाव पातळीवर ‘आता हवा आमदार नवा’ हे घोषवाक्य असलेले फलकही गावागावांतील भिंतीवर डकवून प्रचार सुरू केला आहे. दुसऱ्या बाजूला माजी आमदार विलासराव जगताप यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी उमेदवार मान्य नसल्याचे सांगत भाजपचा त्याग करत खासदार विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी रान उठवले. यामुळे जतची उमेदवारी मिळेल या आशेवर आमदार पडळकर आहेत. मात्र, त्यांची आणि स्थानिक कार्यकर्त्यांची अद्याप नाळ जुळलेली दिसत नाही. यातूनच स्थानिक विरुद्ध बाहेरील हा वाद जतमध्ये पेटला आहे.

Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
bjp leader shivray Kulkarni
भाजपचे नाव घेणाऱ्यांनी गल्लीबोळात भाजपविरोधात बैठकी…भाजप प्रवक्त्यांच्या आरोपामुळे…
BJP counter meeting outside the Jammu and Kashmir Legislative Assembly
जम्मू-काश्मीर विधानसभेबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; मार्शलच्या सहाय्याने सभागृहाबाहेर काढल्यानंतर पाऊल
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’
Kamathi Vidhan Sabha Constituency President Chandrasekhar Bawankule Nominated
लक्षवेधी लढत: कामठी : भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसाठी प्रतिष्ठेची लढत
Controversial statement, Kunbi, political atmosphere, Wani yavatmal
वणी : न घडलेल्या प्रकाराने राजकीय वातावरण ढवळून निघाले; कुणबी समजाबद्दलच्या वक्तव्यात बोलविता धनी कोण?
maharashtra assembly election 2024, Amravati District,
अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडी, महायुतीसमोर अस्तित्व राखण्‍याचे आव्‍हान

हेही वाचा – जयंत पाटलांच्या इस्लामपूरमध्ये जितेंद्र पाटलांसह दोघे इच्छुक

हेही वाचा – आमदार भरत गोगावले यांच्यावर गुन्हा दाखल करा, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या महिला आघाडीची मागणी

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपची अन्य विधानसभा मतदारसंघात पिछेहाट होत असताना जतमध्ये मात्र त्यांना मोठे मताधिक्य मिळाले. जगताप बाजूला जाऊनही हे मताधिक्य मिळाले असल्याने भाजपमध्ये उमेदवारीचा संघर्ष अधिक तीव्र स्वरुपात दिसत आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रम सावंत यांच्याबद्दल असलेली नाराजी आणि जतच्या पूर्व भागातील ४८ गावांसाठी मंजूर झालेली विस्तारित म्हैसाळ सिंचन योजना यामुळे हा मतदारसंघ आजही भाजपसाठी अनुकूल आहे. तथापि, स्थानिक पातळीवरील जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि केंद्रीय रस्ते विकास महामंडळाचे संचालक रविपाटील यांचाही उमेदवारीचा आग्रह आहे. त्यांनीही गेल्या पाच वर्षांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. याशिवाय डॉ. रवींद्र आरळी, प्रकाश जमदाडे हेही भाजपच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, स्थानिक आणि बाहेरील हा वाद आमदार पडळकर यांच्या विधानसभेतील प्रवेशातील प्रमुख अडसर ठरू पाहतो आहे.