गणोशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सांगली शहरात पोलीसांनी पथ संचलन केले. तसेच मुख्य बाजारपेठेत दंगल विरोधी पथकाचे प्रात्यक्षिक झाले.पुढील आठवड्यामध्ये गणेशाचे आगमन होत आहे. महापूर आणि करोना संकटामुळे गणेशोत्सव गेली तीन वर्षे साजरा करता आला नाही. यावर्षी निर्बंधमुक्त वातावरणात उत्सव साजरा होत असल्याने गणेश भक्तांमध्ये उत्साह आहे. गणेशाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु असून सार्वजनिक मंडळाच्याकडून मंडप उभारणीची कामे सुरु आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – बुलढाणा : पोहण्यासाठी नदीत उतरलेल्या युवकाचा मृत्यू

या पार्श्वभूमीवर उत्सव शांततेत पार पडावा यासाठी शुक्रवारी सायंकाळी उप अधिक्षक अजित टिके यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांचे पथसंचलन झाले. यावेळी गणपती पेठेमध्ये दंगल नियंत्रण पथकाचे प्रात्यक्षिक करण्यात आले.