करोना व्हायरसचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असून महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या १३० वर पोहोचली आहे. अशातच सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये एकाच कुटुंबातील १२ जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. सर्वप्रथम २३ मार्च रोजी कुटुंबातील चार जणांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. ते हज यात्रेवरुन परतले होते. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, यातील ११ जण इस्लामपूरचे रहिवासी आहेत. तर एक महिला कोल्हापूरच्या पेठवडगावची रहिवासी आहे. हज यात्रेवरुन परतलेल्या आपल्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी ती गेली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सर्वात आधी हज यात्रेवरुन परतलेल्या कुटुंबातील चार सदस्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं. २३ मार्चला त्यांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर २५ मार्च रोजी कुटुंबातील अजून पाच सदस्यांची तपासणी करण्यात आली. त्या पाचही जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं. यानंतर वैद्यकीय पथकाने कुटुंबातील तीन अन्य सदस्यांची तपासणी केली असता. त्यांनाही करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्याने करोनाग्रस्तांचा एकूण आकडा १२ झालाय.

दुसरीकडे, मुंबईमधील करोनाबाधितांमध्ये गुरुवारी १५ जणांची भर पडली. त्यामुळे मुंबईमधील करोनाबाधितांची संख्या ७७ वर पोहोचली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी चार रुग्ण हे शहरातील वेगवेगळ्या झोपडपट्ट्यांमधील आहेत. त्यामुळेच आता करोना मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये हातपाय पसरु लागल्याचे चित्र दिसत आहे. मुंबईमधील झोपडपट्ट्यांमध्ये विलगीकरणामध्ये राहणे, सोशल डिस्टन्सींग ठेवणे शक्य होणार नसल्याने झोपडपट्टीमध्ये करोनाचे रुग्ण अढळून आल्याने खळबळ उडाली आहे. देशभरात करोनाग्रस्तांची संख्या आता ७०० च्या जवळपास झाली आहे.