भाजपा भजनी मंडळ नसून एक राजकीय पक्ष असल्याने अन्य पक्षाचे गुणदोष असणारच, असं मत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. सांगलीत भाजपा ४० पेक्षा जास्त जागा जिंकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शनिवारी चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांना सांगलीत उमेदवारांची यादी जाहीर करण्यास विलंब का झाला, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर पाटील म्हणाले, सक्षम इच्छुक उमेदवार पक्षाकडे आकर्षित व्हावे अशी आमची भूमिका होती. भाजपा म्हणजे भजनी मंडळ नसून सत्तेसाठी जे इतर पक्ष करतात तेच आम्ही केले, असेही त्यांनी सांगितले.
सांगलीत भाजपा ७८ पैकी ७७ जागांवर पक्षाच्या चिन्हावर लढवत असून तांत्रिक कारणामुळे एका ठिकाणी पुरस्कृत उमेदवार उभा करावा लागला, असे त्यांनी स्पष्ट केले. सांगलीतील मतदारांनी भाजपाला संधी द्यावी. शहरातील नागरी प्रश्न सोडवण्यासाठी निधीची कमतरता जाणवू देणार नाही, असे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले.