ग्रामीण भागात नागपंचमी पारंपरिक उत्साहात साजरी करण्यात आली. करोना निर्बंधामुळे गेली दोन वर्षे केवळ औपचारिकता होती. यंदा निर्बंध हटविण्यात आल्याने गावोगावी नागोबा देवालयासमोर महिलांना लोकगीतं म्हणत फेर धरला.
श्रावण महिन्यातील नागपंचमी हा दिवस स्त्रियांसाठी मोठा सण आहे. या दिवशी स्त्रिया घरीच नागाची मूर्ती बसवून किंवा भिंतीवर नागाचा फोटो लावून पूजा केली जाते. पलूस तालुक्यातील ग्रामीण भागात नागोबा मंदिरात जाऊनही दुध लाह्या अर्पण करून पुजा करून पारंपरिक पद्धतीने नागपंचमी साजरी करण्यात आली. नागाच्या मूर्तीला हळद-कुंकू लावून, दुर्वा-फुले वाहून, लाहया व दुधाचा नैवेद्य दाखवण्यात आला.
या दिवशी नागाची पूजा का करायची तर नागदेवता आपल्या कुळाचा, आपल्या शेताचा रक्षणकर्ता आहे म्हणून नागदेवाची पूजा करतात. त्या दिवशी पुरणाची कानोला बनवून नवेद्य बनवला जातो. नागपंचमी या सणाला स्त्रिया नवीन वस्त्रालंकार लेवून निरनिराळे खेळ खेळतात. फुगडी, झिम्मा, कोंबडा, फेर हे खेळ खेळतात. असाच फेर आज आमणापूर कृष्णाकाठी पहायला मिळाला. यावेळी लहान मुलींपासून मोठया स्त्रिया सर्व खेळामध्ये सहभागी झाल्याचे पहायला मिळाले.