सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपशी केलेली युती ही राजकीय असून वैचारिक नाही. आमचा पक्ष शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारावरच चालणारा आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकवडी यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विकास कामांना गती मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आम्ही महायुतीत सहभागी असलो तरी सहभागी सर्वच पक्षांची आपली स्वतंत्र विचारधारा आहे. त्यानुसारच पक्ष चालविला जात आहे असे सांगून नायकवडी म्हणाले, की आमचा पक्ष सत्तेत सहभागी झाला म्हणजे भाजपमध्ये सहभागी होणार असा गैरसमज जाणीवपूर्वक पसरविला जात आहे.

हेही वाचा : मराठा सर्वेक्षणात सरकारचा नाकर्तेपणा – जयंत पाटील

उपमुख्यमंत्री पवार दि. ५ फेब्रुवारीमध्ये सांगली दौर्‍यावर येत असून या वेळी महापालिका क्षेत्रात कोणताही राजकीय कार्यक्रम अथवा पक्ष प्रवेश होणार नाहीत. ग्रामीण भागात विटा व जत येथे मेळावे आयोजित करण्यात आले असून यानंतर कुपवाड येथील क्रीडांगणाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

हेही वाचा : भाजपची आता राम यात्रा, महाराष्ट्रातून विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची तयारी

आपण निधीसाठी उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतल्याचे सांगत महापालिका क्षेत्रातील काही मंडळी पक्ष प्रवेशाचे संकेत देत असले तरी पक्षात प्रवेश देत असताना संबंधितांचा पुर्व इतिहास आणि पक्ष प्रवेशाचा हेतू पाहूनच निर्णय घेतला जाईल. महापालिका क्षेत्रात कोणाला पक्षात घ्यायचे याबाबत अंतिम निर्णय माझ्या सल्ल्यानेच होतील असेही नायकवडी यांनी यावेळी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sangli ncp leader idris naikwadi said bjp ncp alliance is political not ideological css