सांंगली : देशात सुबत्ता निर्माण करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, तंत्रज्ञानाची नक्कल न करता आपण आपले तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज आहे. जगात आपण भारी ठरू शकतो. मात्र, यासाठी गरीब-श्रीमंत ही विषमता नष्ट केली पाहिजे, असे मत पद्मभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी सांगलीत बोलताना व्यक्त केले.

कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था व कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित कर्मवीरभूषण वितरण सोहळा त्यांच्या हस्ते संपन्न झाला. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारती विद्यापीठाचे कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम होते. या वेळी डॉ. अजित पाटणकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविकामध्ये संस्थेच्या सामाजिक व आर्थिक कार्याची माहिती दिली.

Sustainability Crusader Award Announced to Alok Kale Founder and Managing Director of Magnus Ventures Pune news
औद्योगिक कचऱ्यातून नवव्यवसायाची निर्मिती! पुण्यातील तरुण उद्योजकाचा प्रवास
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
State Government approved one time transfer for Community Health Officers under National Health Mission
आता समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्याही बदल्या होणार
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
allahabad highcourt
“हे हिंदुस्थान आहे, बहुसंख्याकांच्या इच्छेनुसारच देश चालणार”, न्यायाधीशांच्या वक्तव्याची चर्चा!
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त
Revealing Interview Yuval Noah Harari Problem Crisis Artificial Intelligence
सशक्तदेखील स्वत:ला ‘बळी’ म्हणवतात, ही आजची समस्या!
Rock dove bird pune, Rock dove, Municipal Corporation pune, pune,
पुणे : पारव्यांना खाद्य टाकताय सावधान…! महापालिका वसूल करणार ‘एवढा’ दंड

हेही वाचा – Hasan Mushrif : हसन मुश्रीफांची समरजिसिंह घाटगेंवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले, “अशा लोकांच्या…”

डॉ. काकोडकर म्हणाले, की भारत तरुणांचा देश आहे. तरुणांत मोठी प्रतिभा आहे. मात्र, त्यांना वाव मिळाला पाहिजे. आपण नजीकच्या काळात महासत्ता बनू शकतो. मात्र, गरीब-श्रीमंत ही विषमताही नष्ट करण्याची गरज आहे. शेतात घरी बसून आपला तरुण उत्पादन करू शकेल व व्यवसाय मिळवू शकेल. वर्क फ्रॉम होत असेल, तर वर्क फ्रॉम व्हिलेजसुद्धा होऊ शकते. आपल्या तरुणांनी शहराकडे जाण्याची आवश्यकता भासणार नाही. आपल्याकडे खूप संसाधने असल्यामुळे शहरातील माणसे खेड्याकडे येतील. त्यातून अर्थव्यवस्थेला गती मिळेल.

हेही वाचा – Akshay Shinde Encounter : मुंब्रा बायपासवर असा घडला अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर, वाचा चकमकीचा घटनाक्रम

या वेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कर्मवीर कृषिभूषण, प्रा. डॉ. डी. डी. चौगुले यांना कर्मवीर विद्याभूषण व उद्योजक योगेश लक्ष्मण राजहंस यांना कर्मवीर उद्योगभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मूकबधिर मुलांच्या शाळेस रु. एक लाखाच्या मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला.

Story img Loader