“ सुप्रसिध्द नर्तिका मानसीताईंनी पाटील जोमात आहेत, असे म्हटले असले तरी डोंगार, झाडी समदं ओकेमुळेच बोलावणं येतं. नाहीतर पाटलांना कोण विचारतो? तरीही सध्या जोमात नसलो तरी बरं चाललं आहे.” असे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी पलूस येथे दहीहंडीवेळी बोलताना सांगितले.
पलूस येथे पृथ्वीसंग्रामच्यावतीने दहीहंडीचे गुरूवारी सायंकाळी आयोजन करण्याात आले होते. या कार्यक्रमास माजी खा. निलेश राणे, संग्रामसिंह देशमुख, संदीप पाटील आदी उपस्थित होते.
सांगली : मिरज तालुक्यातील शिपूरमध्ये उसाच्या फडात आढळली गांजा शेती
या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मानसी नाईक यांच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नाईक यांनी डोंगार, झाडी, समदं ओके या वक्तव्यामुळे आमदार पाटील जोमात असल्याचे सांगितले. हाच धागा पकडून आमदार पाटील म्हणाले की, “ डोंगार, झाडी यामुळेच ठिकठिकाणी कार्यक्रमासाठी बोलावणं येते. अन्यथा पाटलांना कोण विचारतो?”
तसेच, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे दहीहंडीला खेळाचा दर्जा मिळाला असून नोकरीमध्ये गोविंदांना आरक्षणही जाहीर करण्यात आले आहे.” असेही आमदार पाटील म्हणाले.
बापूंनी कोकणातही यावे – निलेश राणे
यावेळी बोलताना निलेश राणे म्हणाले की, “डोंगार, झाडीमुळे आमदार पाटील यांची सिनेअभिनेता शाहरूख खान इतकी लोकप्रियता महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. बापूंनी कोकणातही यावे, तिथेही झाडी, डोंगर आहेत. राज्यात अडीच वर्षानंतर हिंदू धर्माच्या सणासाठी आमदार पाटील यांच्यासारख्या योद्ध्यांनी करोनाचे संकट घालविले आहे. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळेच राज्यात उत्सव निर्बंधमुक्त झाले.”
यावेळी मानसी नाईक यांनी ठसकेबाज लावण्या सादर केल्या. यामध्ये पाटील वाड्यावर या… या गाण्याने तर तरूणाई बेभान होउन नाचताना दिसली.