सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसची झालेली एकीची मूठ ज्यांना बघवली नाही, त्यांनी खडे टाकण्याचे काम केले. मात्र, जनतेनेच त्यांना त्यांची जागा दाखवून दिली असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांनी केले.

शुक्रवारी रात्री मदन पाटील युवा मंचच्यावतीने नूतन खासदार विशाल पाटील यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, माजी महापौर किशोर जामदार, मैनुद्दीन बागवान यांच्यासह माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रारंभी युवा मंचचे अध्यक्ष आनंदा लेंगरे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसची उमेदवारी श्रीमती पाटील यांनाच मिळावी अशी मागणी केली.

Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
guruji Nitesh Karale concern over giving opportunity to mp Kale wife Mayura Kale in Maharashtra
Video : कराळे गुरूजींची स्वपक्षीय खासदाराबद्दल ‘खदखद’,काय म्हणाले  ?
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’
13 ex corporators left bjp in the pimpri chinchwad
पिंपरीत भाजपपुढे नाराजांची डोकेदुखी; आतापर्यंत १३ माजी नगरसेवकांचे पक्षांतर
Chief Minister Eknath shinde understanding of independent parties in Thane print politics news
ठाण्यातील स्वपक्षीय नाराजांची मुख्यमंत्र्यांकडून समजूत,प्रचाराला लागण्याचे आदेश; केळकर यांनाही कार्यकर्त्यांना जपण्याचा सल्ला
Ajit Pawar lashed out at the group over the issue of disclaimer regarding the clock symbol print politics news
घड्याळाबाबत अस्वीकरणाच्या मुद्द्यावरून अजित पवार गटाला फटकारले

हेही वाचा – सोलापुरात जातीय दंगल घडविण्याचा भाजपवाल्याचा डाव होता, खासदार प्रणिती शिंदे यांचा फडणवीसांवर थेट हल्लाबोल

यावेळी बोलताना डॉ. कदम म्हणाले, सांगलीतील काँग्रेस एकत्र करत सर्वांची आम्ही मूठ बांधली. आमच्यातील हेवेदावे सगळे विसरुन आम्ही एकदिलाने काम करण्याचा निर्णय घेतला. सगळी कटुता बाजूला ठेवत जिल्ह्याच्या विकासासाठी आणि काँग्रेस नेत्यांसाठी एकत्र काम करण्याची सर्व काँग्रेस नेत्यांनी तयारी दर्शवली. पण आमची झालेली ही एकजुट आणि आम्ही बांधलेली मूठ काही जणांना पाहवली नाही. तसेच काँग्रेस नेत्यांची, कार्यकर्त्याची एकजूट होत असताना ज्यांनी ज्यांनी खडे टाकण्याचे प्रयत्न केले त्यांना त्याची जागा या लोकसभेत दाखवून दिली आहे. पुन्हा ते आपल्यामध्ये खडे टाकण्याचे काम करणार नाहीत. पण आपली नेत्याची आणि कार्यकर्त्याची एकजुट कायम राहायला हवी, असेही ते म्हणाले.

गेली १० वर्षे जिल्ह्याची विकासाच्या नावाखाली केवळ फसवणूक झाली. यात बदल म्हणून आपल्याला आपल्या विचाराचा खासदार दिल्लीला पाठवणे गरजेचेचे होते आणि आपण तो पाठवला. येत्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात ४ ते ५ जागांवर काँग्रेस पक्ष लढणार आणि जिंकणार असा विश्वासही कदम यांनी बोलून दाखवला.

हेही वाचा – आमदार दत्ता भरणेंना सायबर चोरट्यांचा गंडा; किस्सा सांगताना म्हणाले, “मी फसलो पण तुम्ही…”

सांगली शहरातून दोन आमदार देखील विधीमंडळात पाठवू असा विश्वास कदम यांनी कार्यकर्त्यांना बोलून दाखवला. २२ तारखेला सांगली जिल्ह्याची नियोजन कमिटीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आहे. विशाल पाटील यांची ही सांगलीतील पहिली बैठक असेल आणि विरोधकांची शेवटची बैठक असेल असे कदम म्हणाले.