सांगली : शिराळा तालुक्यातील शेंडगेवाडीमध्ये झालेल्या आंदोलन प्रकरणी दाखल गुन्ह्यातून मनसे प्रमुख राज ठाकरे यांना मुक्त करण्याचा विनंती अर्ज न्यायालयाने नामंजूर केला. या खटल्याची पुढील सुनावणी सहा डिसेंबरला होणार आहे. जिल्ह्यातील शेडगेवाडी फाट्याजवळ मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. रेल्वे कर्मचारी भरतीमध्ये परप्रांतीय तरुणांऐवजी मराठी व स्थानिक तरुणांना संधी मिळावी यासाठी २००८ मध्ये मनसेच्यावतीने आंदोलन पुकारण्यात आले होते. यावेळी शेंडगेवाडी येथे बंद पाळण्यात आला होता. बेकायदा जमाव गोळा केला, जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास भाग पाडले, म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह शिरीष पारकर, जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत यांच्या सहित १० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या खटल्याची आज न्यायालयात सुनावणी होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा