सांगली : चार शतकांचा साक्षीदार असलेल्या भोसेतील वटवृक्षाच्या फांद्या जिल्ह्यातील ७०० गावात लावून ऐतिहासिक वडाच्या स्मृती जतन करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला. राष्ट्रीय महामार्गाची दिशाही बदलण्यास भाग पडलेल्या या वटवृक्षाचे दोन दिवसांपूर्वी सततच्या पावसाने पतन झाले.

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गामध्ये येत असल्याने या वडाच्या झाडाच्य पतनाचे संकट उभे ठाकले होते. त्यावेळी पर्यावरण रक्षणासाठी काम करत असलेल्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना हा वटवृक्ष वाचविण्याची विनंती केली असता राष्ट्रीय महामार्गाचे आरेखन बदलून हे झाड वाचविले होते. मात्र, सोमवारी सततच्या पावसाने आणि महामार्गाच्या कामामुळे झाडांची मुळे सैल झाल्याकारणाने ५०० मीटर परिसर व्यापणारा महाकाय वड उन्मळून पडला. याची दखल जिल्हा परिषदेने घेतली.

child died in a leopard attack in Nandurbar district
नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Aerial inspection of Salher fort in Baglan taluka by UNESCO team nashik news
युनेस्को पथकाकडून ‘साल्हेर’ची हवाई पाहणी
caste panchayat investigates woman for love marriage with father in law in chhatrapati sambhajinagar
सासऱ्याच्या प्रेमविवाहाबद्दल महिलेला जातपंचायतीचा जाच
Heavy rain in Miraj taluka sangli
सांगली: मिरज तालुक्यात मुसळधार पाऊस, एकजण पुरात गेला वाहून
Death of a T-9 tiger, ​​Navegaon-Nagzira Sanctuary, tiger,
गोंदिया : वर्चस्वाच्या झुंजीत टी-९ वाघाचा मृत्यू; नवेगाव-नागझिरा अभयारण्याच्या गाभा क्षेत्रातील घटना
Local representatives upset over the interference of MLAs in Nagpur in the planning of iron ore and other minor mineral funds
गडचिरोली जिल्हा खनिज निधीवर नागपुरातील आमदारांचा डोळा?; जिल्हाबाहेरील कंत्राटदारांची रेलचेल वाढली
central government nominated Salher Fort in preliminary list of UNESCO World Heritage Sites
नाशिक : युनेस्को पथक लवकरच साल्हेर किल्ल्यावर, जागतिक वारसा स्थळांत स्थान मिळण्यासाठी प्रशासनाची तयारी

हेही वाचा – कोल्हापुरात आढळला दुर्मिळ स्पॉटेड वूल्फ स्नेक

हेही वाचा – कृष्णा खोऱ्यातील महापूर रोखण्यासाठी उपाययोजना करू; अलमट्टी प्रकल्पाच्या अधीक्षक अभियंत्यांची ग्वाही

मंगळवारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे, गटविकास अधिकारी अविशाश पाटील, ग्रामविस्तार अधिकारी विनायक मोरे, गावचे सरपंच पारिसनाथ चौगुले,अमोल गणेशवाडे, वृक्षप्रेमी प्रवीण शिंदे यांनी भेट देऊन पुनर्रोपण करता येईल का याची पाहणी केली. या वृक्षाचा बुंधा आहे त्याच ठिकाणी जतन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर महाकाय वडाच्या फांद्या काढून जिल्ह्यातील ७०० गावामध्ये ग्रामपंचायतीच्यावतीने रोपण करण्याचा निर्णयही घेण्यात आला असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले.