सांगली : वार्षिक नूतनीकरणाच्या नावाखाली विलंब शुल्कापोटी प्रतिदिन लावण्यात येणारा पन्नास रुपये कराच्या विरोधात शनिवारी सायंकाळी उबाठा शिवसेनेच्यावतीने सांगलीत निदर्शने करण्यात आली.
हेही वाचा – कोल्हापुरात कोयना एक्स्प्रेसखाली सापडून इचलकरंजीतील तिघींचा मृत्यू
रिक्षाचालक व हलके वाहनधारक यांच्यावर केंद्र सरकारने वार्षिक नूतनीकरणाच्या निर्धारित वेळेनंतर उशिरा होणाऱ्या प्रत्येक दिवसासाठी पन्नास रुपये कर लावण्यात आला आहे. हा कर चुकीच्या पद्धतीने वसूल केला जाणार आहे. त्याच्या विरोधात आज निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते, उपजिल्हाप्रमुख शंभूराजे काटकर, शहरप्रमुख विराज बुटाले यांनी केले. रिक्षावाल्यांच्या कोणत्याही प्रश्नासाठी वेळ पडल्यास न्यायालयीन लढाईसाठीसुद्धा रिक्षावाल्यांच्या पाठीशी शिवसेना उभी राहील, असे विभुते यांनी यावेळी सांगितले. यावेळी ऑटो रिक्षा युनियन अध्यक्ष बालम मुजावर विद्यार्थी वाहतूक रिक्षा पंचायत संघटनेचे राजू रसाळ, महेश चौगुले, प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.