सांगली : अचानक आलेल्या वादळी वारे आणि गारपीट पावसामुळे सांगलीच्या ऐतवडे खुर्दमध्ये दोन घरावर झाड पडून नुकसान झाले. शुक्रवारी सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने पश्चिम भागात हजेरी लावली असली तरी पूर्व भाग पावसाच्या प्रतिक्षेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथील वैभव बाळासो दाइंगडे व दत्तात्रय शहाजी पाटील यांच्या वारणा शिक्षण संस्थेच्या शेजारी असणाऱ्या घरावर आज झालेल्या व अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट पावसामुळे झाडे पडून मोठे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा – गोदावरीत क्रुझर कोसळून दोघांचा मृत्यू; लोहा व मुदखेड तालुक्यातील सीमेवरील येळी महाटी पुलावरील दुर्घटना

हेही वाचा – शिवजयंतीच्या दरबार मिरवणुकीत शिवप्रेमी जनतेचा उच्चांकी सहभाग; शिवमय कराडनगरीत छत्रपती शिवरायांचा जयघोष

शुक्रवारी दिवसभर उन्हाने लाहीलाही होत असताना सायंकाळी विजेच्या गडगडाटासह ऐतवडे खुर्दसह कुंडलवाडी चिकुर्डे देवर्डे आदी परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. यामध्ये ऐतवडे खुर्दमधील दोन घरांवर झाडे पडल्याने भिंत पडून मोठे नुकसान झाले तर वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर पडली. ऐतवडे खुर्द येथील रस्त्यालगत असणारे अनेक शेत वस्तीवरील पत्र्याचे छप्पर उडून गेले. शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या पावसाने सर्वत्र गारवा निर्माण झाला असून हा पाऊस ऊस पिकाला वरदायी ठरणारा असल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sangli stormy rain in shirala walwa taluka ssb