लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : तासगाव तालुक्यामधील चिंचणी येथे मध्यरात्री अल्टो मोटार कालव्यात कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार चालू आहेत. हे दुर्दैवी कुटुंब तासगावचे आहे. तासगाव – मणेराजुरी मार्गावर चिंचणी हद्दीत मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास एक अल्टो मोटार ताकारी सिंचन योजनेच्या कालव्यात कोसळून भीषण अपघात झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या अपघातात मयत झालेल्यांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. मृतांमध्ये राजेंद्र जगन्नाथ पाटील (वय ६० वर्षे), सुजाता राजेंद्र पाटील (५५), प्रियांका अवधूत खराडे (३०, बुधगाव) यांच्यासह ध्रुवा (३), कार्तिकी (१) आणि राजवी (३) यांचा समावेश असून स्वप्नाली विकास भोसले (३०) ही महिला गंभीर जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sangli tasgaon alto car fell into canal 6 dead including 3 children asc
Show comments