सांगली : दिवाळी फराळासोबत पैसे वाटत असताना दोघांना पकडून १ लाख ३ हजार ५०० रुपये जप्त करण्यात आले. त्यांच्याविरुध्द तासगाव पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार रोहित पाटील यांना मतदान व्हावे यासाठी हे पैशाचे वाटप सुरू होते, असा आरोप माजी खासदार व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उमेदवार रोहित पाटील यांची प्रचारफेरी साठेनगर परिसरात होती. या दरम्यान, काही कार्यकर्त्यांकडून दिवाळी फराळासोबत पैशाचे वाटप होत असल्याची तक्रार येताच माजी खासदार पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडले. त्यांच्याकडून ध्वनिचित्रफितीवर कबुली घेण्यात आली. या यप्रकरणी पोलीस ठाण्यात व निवडणूक निरीक्षकांकडे तक्रार करून दोघांना ताब्यात देण्यात आले.

हेही वाचा :सांगली, जत, खानापूरमध्ये बंडखोरी; अन्यत्र आघाडी – महायुती लढत

या प्रकरणी निवडणूक निरीक्षक शिवप्रसाद भिसे यांनी तासगाव पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली असून या तक्रारीनुसार सचिन उर्फ बाबजी गणपतराव पाटील व बाबासाहेब उर्फ खंडू निवृत्ती कदम या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावेळी दिवाळी फराळासोबत पैशाची पाकिटे वाटण्यात येत होती. या पाकिटात पाचशे रुपयांच्या सहा असे तीन हजार रुपये होते. तसेच काही रक्कम खिशात होती. या दोघांकडून १ लाख ३ हजार ५०० रुपये आणि एक भ्रमणध्वनी जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा :Devendra Fadnavis : ‘ब्राह्मण असणं राजकीयदृष्ट्या अडचणीचं ठरतंय का?’ देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जात…”

पराभूत मानसिकता

पैसे वाटप करून मते मिळविण्याचा विरोधकांचा प्रयत्न त्यांची पराभूत मानसिकता दर्शवत असल्याचा आरोप संजयकाका पाटील यांनी केला असून या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असल्याचे त्यांनी सांगितले. तर रोहित पाटील यांच्याशी याबाबत विचारणा करण्यासाठी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sangli tasgaon money distributed with diwali faral to voters css