सांगली : गावच्या सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या मुख्य नलिकेमधून ७६ हजारांच्या पाण्याची चोरी करण्यात आल्याची तक्रार खरसुंडी (ता. आटपाडी) येथील ग्रामविस्तार अधिकार्‍यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या पाणी चोरी प्रकरणी सिद्धेश्‍वर पुजारी यांच्या विरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “…तेव्हा मोरारजी देसाई म्हणाले होते, तुम्हाला गोळ्या..”, उद्धव ठाकरेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग!

हेही वाचा – चौथ्या टप्प्यात मत टप्पा वाढविण्याचे आव्हान

याबाबत माहिती अशी, गावासाठी सार्वजनिक पाणीपुरवठा योजना असून या योजनेची मुख्य जलवाहिनी पाच इंची आहे. विहिरीपासून गावी जलकुंभापर्यंत जलवाहिनी येत असताना मध्येच एक इंची जोडणी करून हे पाणी विहिरीत घेण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार गेल्या एक वर्षापासून सुरू होता. यामुळे गावच्या पिण्याच्या पाण्याचा दाब कमी होऊन पाणी कमी उपलब्ध होत होते. यामुळे पुजारी यांनी ७६ हजाराच्या पाण्याची चोरी केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sangli theft of village water case registered ssb
Show comments