सांगली : घरात घुसून पतीच्या डोळ्यात चटणी टाकून चाकूचा धाक दाखवत लूट करणार्‍या तिघांना पोलीसांनी बुधवारी अटक केली. त्यांच्याकडून लुटीतील ९० हजाराचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजयनगर येथील दत्त कॉलनीमध्ये वास्तव्यास असलेल्या संगीता रामचंद्र ठोंबरे यांच्या घरात तीन अज्ञातांनी दि. ५ जुलै रोजी रात्री साडेअकरा वाजता लूट केली होती. एकाने घरात घुसून पतीच्या डोळ्यात चटणी टाकून पोटास चाकू लावला तर एकाने महिलेच्या गळ्यास विळा लावून कर्णफुले, झुबे, गळ्यातील बोरमाळ असा दोन तोळे वजनाचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनीही संजयनगर पोलीस ठाण्यात जाऊन या जबरी चोरीचा तपास गतीने करा, अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागले असा इशारा दिला होता.

हेही वाचा – सोलापूर : उजनी धरणात महिनाभरात १३ टीएमसी पाणीसाठा वधारला, पावसाचा आशा-निराशेचा खेळ सुरूच

हेही वाचा – “…म्हणून हा पळपुटेपणा शिंदे सरकारने केला आहे”, पुरवणी मागण्यांवरून जयंत पाटलांचं टीकास्र!

दरम्यान, या प्रकरणी पोलीसांनी वाहिद मुसा पखाली (वय ४९, रा. शिंदे मळा), सलीम मेहबूब शेख (वय ३५, रा. संजय गांधी झोपडपट्टी) आणि तातोबा लक्ष्मण कांबळे (वय ५० रा. उत्तर शिवाजीनगर) या तिघांना अटक करून लुटीतील ऐवज हस्तगत केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sangli three robbers arrested for loot and throwing chutney in eyes ssb
Show comments