सांगली : एका अपघाताच्या गुन्ह्यातील दुचाकी सोडणे अन तपासात मदत करण्यासाठी २५ हजाराची लाच मागणारे दोन पोलीस लाचलुचपत’ प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात सापडले. जत पोलीस ठाण्यातील गणेश ईश्वरा बागडी व संभाजी मारुती करांडे अशी लाचखोर पोलिसांची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

  जत पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल असलेल्या भावाला गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि या अपघातात जप्त असलेली मोटरसायकल सोडण्यासाठी दोन पोलिसांनी २५ हजार रुपयांची लाच मागितली. संबंधित तक्रारदार यांच्या भावावर जत पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल आहे. या अपघात प्रकरणी संबंधिताची दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्यात संबंधिताला मदत करण्यासाठी व जप्त केलेली मोटरसायकल सोडवण्यासाठी गणेश  बागडी यांनी तक्रारदार यांच्याकडे २५ हजार रुपये लाच मागितली होती.  याबाबत संबंधिताने बागडी यांच्याविरोधात सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने दोन दिवस बागडी व कारंडे यांची सापळा लावून चौकशी करण्यात आली. यामध्ये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज संबंधित तक्रारदाराला २५ हजार रुपये घेऊन जत पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले. यावेळी संभाजी कारंडे यांनी तक्रारदार यांच्याकडून २५ हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारली. याचवेळी लाचलुचपतच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.