सांगली : सांगलीतील ज्येष्ठ साहित्यिक वसंत केशव पाटील (वय ७९) यांचे बुधवारी निधन झाले. पाटील यांना डॉ. हरिवंशराय बच्चन यांच्या दशद्वार ते सोपान या आत्मचरित्राच्या अनुवादासाठी १९९६ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.
वसंत केशव पाटील यांचे मूळ गाव कुमठे (ता. तासगाव, जि. सांगली) आहे. रयत शिक्षण संस्थेतून शिक्षक म्हणून सेवा सुरू केली आणि हिंदी विषयाचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. ग्रामीण मराठी व हिंदी साहित्यात त्यांनी मोठे योगदान दिले.
हेही वाचा – मतदानाआधीच सुनेत्रा पवारांना मोठा दिलासा, ‘या’ घोटाळ्यातून मिळाली क्लीन चिट!
हेही वाचा – उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका; म्हणाले, “गद्दारी झाली नसती तर…”
यशवंतरावः विचार आणि वारसा, छप्पर, आधुनिक शिक्षा शिल्पी : कर्मवीर भाऊराव पाटील, कंदिलाचा उजेड, सहीमागाचा माणूस असे त्यांनी कादंबरी, कथा, अनुवाद व कविता यामध्ये विपुल लेखन केले. ‘केशवसुतांच्या निवडक कविता’ असे नवे पुस्तक त्यांचे प्रकाशनाच्या मार्गावर होते.