सांगली : सांगली विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसअंतर्गत बंडखोरीचे षडयंत्र भाजपकडून गेली सहा महिने शिजत होते, असा आरोप काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी केला. निवडणूक नियोजनासाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांतील पदाधिकाऱ्यांची व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक मंगळवारी रात्री पार पडली. या वेळी पाटील बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, राहुल पवार, शिवसेना ठाकरे गटाचे शंभोराज काटकर, शेकापचे अजित सूर्यवंशी, सनी धोतरे, अमृता चोपडे आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, काँग्रेसमधील बंडखोरी टाळण्यासाठी प्रयत्न झाले. श्रीमती पाटील यांना विधान परिषदेवर संधी देण्याची तयारीही दर्शवली. आ. कदम यांनी बंडखोरी टाळण्याचे प्रयत्न केले. मात्र टाळता आली नाही. बंडखोरीसाठी भाजपकडून गेल्या सहा महिन्यापासून प्रयत्न सुरू होते.

What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Eknath Shinde Shivsena Total Candidate List in Marathi
Shinde Shivsena Full Candidate List : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ८५ शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात; संपूर्ण यादी एका क्लिकवर!
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
sharad pawar retirement (1)
Video: शरद पवारांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत, आता राज्यसभेतही जाणार नाही? भाषणात म्हणाले…
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा : Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”

राज्यात पक्ष फोडीचा पॅटर्न राबविणाऱ्या भाजपने सांगलीत तोच कित्ता गिरवला आहे. हा डाव जनताच हाणून पाडेल. या स्थितीत कार्यकर्त्यांवर दबाव आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या माध्यमातून भाजपला मदत करण्याचा हेतू स्पष्ट होत असल्याचे दिसते. सांगलीतील जनता आता भाजपला आणि सुधीर गाडगीळ यांना कंटाळली आहे. यामुळे महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे.

हेही वाचा : Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा वचननामा जाहीर, छत्रपती शिवरायांचं मंदिर, मोफत शिक्षण आणि काय काय वचनं?

यावेळी बोलताना बजाज म्हणाले, गेली दहा वर्षे पाटील सांगलीतील जनतेच्या हक्कासाठी संघर्ष करत आहेत. विरोधक कसा असावा, सरकारला रस्त्यावर उतरून जाब कसा विचारावा हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. सामान्यांसाठी रस्त्यावर उतरणारा जर लोकप्रतिनिधी सांगलीला मिळाला तर निश्चितच मतदारसंघात बदल घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Story img Loader