पतीने मोबाईल अनलॉक करून दिला नाही म्हणून नाराज झालेल्या पत्नीने गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना वाळवा तालुक्यातील शिरटे येथे घडली आहे. मनिषा भगवान खोत (वय-३८) असे या महिलेचे नाव आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

 वाळवा तालुक्यातील शिरटे येथील भगवान खोत हे पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. कमी शेती असल्याने भगवान खोत हे साखर कारखान्यात नोकरी आणि शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. दरम्यान काल (शुक्रवार) सकाळी भगवान यांचा मोबाईल पत्नी मनिषा यांनी घेतला मात्र तो लॉक असल्याने, त्यांनी तो अनलॉक करून देण्याची भगवान यांच्याकडे मागणी केली.

मात्र, भगवान यांनी मोबाईल अनलॉक करण्यास नकार दिला. मनिषा यांनी मोबाईल अनलॉक करा म्हणून काही काळ हट्टही धरला होता. मात्र, तरी देखील भगवान यांनी पत्नीच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.  

पती आपला हटृ पुरवत नसल्याने नाराज झालेल्या मनिषा यांनी अखेर काही वेळानंतर बाजूच्या खोलीमध्ये जाऊन साडीच्या मदतीने गळफास घेत आत्महत्या केली. अशी माहिती पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी शिवाजी खोत यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.