सांगली : नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधी गोळ्यांची विक्री करण्याच्या प्रयत्नात एका तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मिरज मार्केटमध्ये अटक केल्याचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी रविवारी सायंकाळी सांगितले. त्याच्याकडून १८ हजाराच्या ८९० गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली जिल्हा नशामुक्त अभियान सुरु केले आहे. त्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी मानवी जीवनावर परिणाम करणाऱ्या अंमली पदार्थाची विक्री, तस्करी, साठा व उत्पादन करणारे इसमाचे बायत माहिती काढून त्यांचेवर कारवाईचे आदेश दिले आहेत.

सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत, जयदीप कळेकर व कर्मचाऱ्यांचे पथक कार्यरत करण्यात आले आहे. बेकादेशीर नशेच्या गोळ्या बाळगणारे, विक्री करणारे इसमांचाचत माहिती घेत असताना, हवालदार अमोल ऐदाळे व अतुल माने यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, जुनेद शेख हा मिरज मार्केट यार्ड परिसर येथे नशेच्या गोळया विक्री करीता घेवुन येणार आहे. या महितीच्या आधारे जुनेद शब्बीर शेख ( वय ३१, रा. हौगड गल्ली, बुधवार पे मिरज) हा त्याचे हातात पांढऱ्या रंगाची प्लॅस्टीकची पिशवी घेवून संशयीत रित्या जात असताना दिसून आला. त्याला ताब्यात घेऊन पांढ-या पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये एकुण १८,०००/- रु. किंमतीच्या ८९० नशेच्या गोळ्या मिळून आल्या आहेत. हा औषधी साठा हा डॉक्टरांचे सल्ल्याविना विनाकारण घेतल्यास तो मानवी जिवीतास व शरीरास अपायकारक आहे. सदर औषधांमुळे मानवी मेंदुवर गुंगिकारक परिणाम होतात असे औषध निरीक्षक राहुल करंडे यांनी समक्ष सांगितले. त्याने सदरची औषधे ही नशा करणारे इसमांना जादा दराने विक्री करणेकरीता बाळगली आहे असे सांगितले. त्याने सदरच्या गोळया तो काम करत असलेल्या मिरज येथील वडगांवकर हॉस्पीटलचे मेडीकल मधून कोणास काही एक न सांगता, गुपचूप घेतल्या असल्याची कबुली देवून सदरच्या गोळ्या नशा करण्यासाठी चढ्या दराने विक्री करण्यासाठी आणल्या असलेचे सांगितले.