लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : ‘माझी वसुंधरा अभियाना’मध्ये सांगली जिल्हा परिषदेचा राज्यात प्रथम क्रमांक आला असून जिल्हा परिषद सांगली अंतर्गत असलेल्या १६ ग्रामपंचायतींनी विविध विभागांत यश मिळवले असून त्यांना ९ कोटी २० लाखांचे बक्षीस मिळाले आहे.

narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sharad Pawar Dhananjay Munde
Sharad Pawar : “सत्ता फार लवकर डोक्यात गेली”, शरद पवारांचा धनंजय मुंडेंना टोला; म्हणाले, “अडचणींच्या काळात…”
Ajit Pawar on Ramraje Naik Nimbalkar
Ajit Pawar : “…मग मी बघतो, तुम्ही आमदार कसे राहता”, अजित पवारांचा रामराजे निंबाळकरांना इशारा; म्हणाले, “धमक असेल तर…”
anup dhotre
काँग्रेसची सत्ता असलेली राज्ये शाही परिवाराचे ‘एटीएम’; अकोल्यातील प्रचारसभेत पंतप्रधान मोदींची टीका
narendra modi akola public rally
मोदींच्या सभेसाठी अकोल्यात जय्यत तयारी; काय बोलणार याकडे लक्ष?
Devendra Fadnavis Constituency, Sachin Waghade,
फडणवीसांच्या मतदारसंघातील उमेदवार म्हणतो, “मी बेरोजगार, मला मत द्या…”
Numerology: People Born on These Dates Are Blessed by Lord Shani
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते नेहमी शनि देवाची कृपा

जिल्ह्यातील १० हजाराच्यावर लोकसंख्या असणाऱ्या गटात वाळवा तालुक्यातील कासेगाव ग्रामपंचायतीचा राज्यात तिसरा क्रमांक आला असून तासगाव तालुक्यातील येळावी व मिरज तालुक्यातील कवलापूर ग्रामपंचायतींचा विभागात नंबर आला आहे.

आणखी वाचा-Jitendra Awhad : “पांढरे कपडे सोडून गुलाबी झालेल्या…”; जितेंद्र आव्हाडांकडून व्हिडीओ शेअर करत अजित पवारांवर हल्लाबोल

पाच ते दहा हजार लोकसंख्या गटात वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी ग्रामपंचायतीचा राज्यात प्रथम क्रमांक आला असून भूमी या थिमॅटिक विभागात देखील प्रथम क्रमांक आला आहे. वाळवा तालुक्यातील वाटेगाव ग्रामपंचायतीस तसेच मिरज तालुक्यातील समडोळी ग्रामपंचायतीस राज्यस्तरावर उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त झाले आहे. पलूस तालुक्यातील वसगडे व नागठाणे ग्रामपंचायतींना विभागातील बक्षीस मिळाले आहे.

अडीच ते पाच हजार या लोकसंख्या गटात कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे ग्रामपंचायतचा राज्यात प्रथम क्रमांक आला असून भूमी या थिमॅटिक विभागात प्रथम क्रमांक आला आहे. विभागात कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव व घाटनांद्रे ग्रामपंचायतीस बक्षीस प्राप्त झाले आहे.

आणखी वाचा-Harshvardhan Patil : तुम्ही भाजपा सोडणार का? हर्षवर्धन पाटलांचं सूचक भाष्य; म्हणाले, “लोकांचा आग्रह…”

पंधराशे ते पाच हजार या लोकसंख्या गटात कवठेमहांकाळ तालुक्यातील लंगरपेठ या -ग्रामपंचायतीस राज्यस्तरावर उत्तेजनार्थ तसेच विभागात बनेवाडी व पलुस तालुक्यातील खंडोबाची वाडी ग्रामपंचायतला बक्षीस प्राप्त झाले आहे. पंधराशेखालील लोकसंख्या गटात जिल्ह्यातील कुंडलापूर व कौलगे ग्रामपंचायतीस विभागातील बक्षीस प्राप्त झाले आहे. सांगली जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतीस ९ कोटी २० लाखांचे पुरस्कार मिळाले आहेत.

जिल्हा परिषद सांगलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नेतृत्वाखाली व ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी यशस्वी कामगिरी केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्हा परिषद व बक्षीस पात्र सर्व ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात येणार आहे.