लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामध्ये २९ लाखांच्या संगणक, प्रिंटर आणि यूपीएस खरेदीमध्ये अनियमितता आढळल्याप्रकरणी पर्यवेक्षक व कनिष्ठ सहायक लेखाधिकारी अशा दोघांना निलंबित करण्यात आले असून आणखी काही वरिष्ठ अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात असल्याची माहिती मिळाली.

Prime Minister Narendra Modi will lay the foundation of the PM Mega Textile Park project in state
पंतप्रधान मोदी करणार राज्यातील ‘या’ एकमेव प्रकल्पाची पायाभरणी
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
Narendra Modi Wardha tour Union Ministry of Micro and Small Scale Vishwakarma Yojana Programme
आमचे काय ? पंतप्रधानांचा दौरा आणि भाजप नेत्यांना पडला पेच, जिल्हाधिकाऱी म्हणतात हा तर…
Wardha, Narendra Modi, Nitesh Karale master,
वर्धा : सभा पंतप्रधान नरेंद्र मोदींची अन् संतप्त मात्र कराळे गुरुजी! काय आहे कारण?
Ajit Pawar private secretary, Supriya Sule,
बारामतीत शासकीय कार्यक्रमात अजित पवारांंचा खासगी सचिव व्यासपीठावर?; राजशिष्टाचारात बदल केले का? सुप्रिया सुळेंचा सवाल
Sexual assault journalist Kalyan,
कल्याणमध्ये महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार
bombay hc asks state govt to explain delay in appointing members of maharashtra sc and st commission
अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची अद्याप नियुक्ती का नाही ? भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
Solapur District Bank Scam
सोलापूर जिल्हा बँक घोटाळा सुनावणी पूर्ण; निकालाविषयी उत्सुकता

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामध्ये २९ लाख रुपयांचे ४२ संगणक, प्रिंटर आणि यूपीएस मशीन खरेदी केल्या होत्या. पण, खरेदीची ही प्रक्रिया पूर्णपणे चुकीच्या पध्दतीने राबविल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्याने जिल्हा परिषदेकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांच्या नेतृत्वाखाली तीन अधिकाऱ्यांची समिती गठीत केली होती. या समितीने चौकशी अहवाल दिल्यानंतर पशुसंवर्धन विभागातील दोन कर्मचारी प्रवीण चव्हाण आणि जैनुद्दीन मुल्ला या दोघांवर गेल्या आठवड्यात निलंबनाची कारवाई करण्यात आली.

आणखी वाचा-सांगली ध्वनिप्रदूषण, लेझरप्रकरणी १४७ मंडळांवर कारवाई

तसेच या विभागातील चार अधिकाऱ्यांना संगणक खरेदीमध्ये झालेल्या कथित अनियमितताप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीसा बजावण्यात आलेले अधिकारी वर्ग एकचे असल्याने त्यांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर अहवाल शासनाला पाठविण्यात येणार आहे. यानंतर या चार अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाण्याचे संकेत मिळाले.

निलंबित झालेले चव्हाण यांना तासगाव पंचायत समिती, तर मुल्ला यांना कवठेमहांकाळ पंचायत समितीमध्ये उपस्थित राहण्याची सूचना दिली आहे. तसेच उर्वरित अधिकारी वर्ग एकचे असल्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा अधिकार राज्य शासनाचा आहे. म्हणून अहवाल राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे, असे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.