शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीकास्र सोडलं आहे. शिंदे गटाकडे मी पक्ष म्हणून पाहत नाही. शिंदे गट म्हणजे भाजपाने पाळलेल्या कोंबड्याचा खुराडा आहे. तो राजकीय पक्ष नाही. या कोंबड्या कधीही कापल्या जातील, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं होतं. याला आमदार शहाजीबापू पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“संजय राऊत हे एका बारक्या खुराड्यात बसले आहेत. आमचा पक्ष आहे, हे निवडणूक आयोगाने जाहीररित्या देशाला सांगितलं आहे. ‘बिन बुडाचं अडगं कुणीकडही घरंगळत महाराष्ट्रात हिंडतंय, ओरडतंय आणि अरडतंय,’ याला काहीही अर्थ नाही,” अशा शब्दांत शहाजीबापू पाटलांनी संजय राऊतांचा समाचार घेतला आहे.

हेही वाचा : “भाजपाकडून आम्हाला सापत्न वागणूक मिळत आहे”, गजानन कीर्तिकरांनी व्यक्त केली खंत; म्हणाले, “लोकसभेला…”

“राऊतांची भूमिका सकाळी टीव्हीसमोर १५ मिनिट…”

“संजय राऊतांसारखी माणसं देशाची स्वायत्ता, लोकशाही आणि लोकांचा स्वातंत्र्यावर असलेला विश्वास डळमळीत करण्याचं काम करत आहेत. राऊतांची भूमिका सकाळी टीव्हीसमोर १५ मिनिट सोडून कोणतीही नाही. त्यांनी राजकारणावर भाष्य करू नये,” असा सल्लाही शहाजीबापू पाटलांनी राऊतांना दिला आहे.

हेही वाचा : “भाजपाकडून सापत्न वागणूक”, गजानन कीर्तिकरांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले…

“संजय राऊत महाराष्ट्रात भांडण लावत…”

महाराष्ट्राच्या सत्ता नाट्यावर ‘डायरी ऑफ महाराष्ट्र खोका’ असा चित्रपट काढणार असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं. याबद्दल विचारल्यावर शहाजीबापू पाटलांनी सांगितलं, “खोके-खोके म्हणत संजय राऊत दगडे मारत फिरणार आहेत. राऊतांना कावीळ झाली आहे. उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांसारख्या माणसाच्या हातात कोलीत दिलं आहे. ते महाराष्ट्रात भांडण लावत हिंडत आहेत. त्यामुळे ‘माकडाच्या हातात कोलीत-संजय राऊत’ असा चित्रपट तुम्हाला दिसेन,” असेही शहाजीबापू पाटलांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sangola mla shahajibapu patil reply sanjay raut over shinde group bjp ssa