नगर शहरात बंद पडलेले दोन कारखाने रोजगार उपलब्ध होण्यासाठी पुन्हा सुरू करावेत अशा मागणीचे निवेदन महापौर संग्राम जगताप यांनी मुंबईत व्हिडीओकॉन उद्योग समूहाचे अध्यक्ष वेणुगोपाळ धूत यांची भेट घेऊन दिले.
व्हिडीओकॉन या आंतरराष्ट्रीय कंपनीची सुरुवात नगर शहरातून झाली याचा नगरकरांना निश्चितच अभिमान आहे, मात्र कंपनीने बुरुडगाव रस्ता व बुऱ्हाणनगर येथील कारखाने काही कारणास्तव औरंगाबादला स्थलांतरित केले, त्यामुळे शेकडो युवक-युवती बेरोजगार झाले आहेत. हे दोन्ही कारखाने पुन्हा सुरू केल्यास महापालिकेच्या माध्यमातून या कारखान्यांना सर्व सहकार्य केले जाईल. युवक व युवतींना पुन्हा रोजगार उपलब्ध होण्यासाठी कारखाने पुन्हा सुरू करण्याचा सहानुभूतिपूर्वक विचार करण्याचे आवाहन निवेदनात करण्यात आले आहे.
दोन्ही कारखाने सुरू करण्याचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन धूत यांनी दिल्याचे जगताप यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा