मर्चंट्स सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी संजय बोरा व उपाध्यक्षपदी अजय मुथा यांची एकमताने निवड करण्यात आली.
बँकेच्या संचालक मंडळाच्या शनिवारी झालेल्या सभेत बँकेच्या नव्या पदाधिका-यांची निवड करण्यात आली. सहायक निबंधक एस. आर. परदेशी यांनी पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. सुभाष भांड यांनी अध्यक्षपदासाठी बोरा यांचे तर मीनाताई मुनोत यांनी उपाध्यक्षपदासाठी मुथा यांचे नाव सुचवले. त्याला अनुक्रमे संजीव गांधी व विजय कोथिंबिरे यांनी अनुमोदन दिले.
बोरा यांना बँकेच्या अध्यक्षपदाची दुस-यांदा संधी मिळाली. त्यांचे वडील शांतिलाल बोरा हेही बँकेचे अध्यक्ष होते. राज्य फर्टिलायझर अँड पेस्टीसाइड्स असोसिएशनचे ते उपाध्यक्ष आहेत. अन्य सामाजिक संस्स्थांशीही ते निगडित आहेत. उपाध्यक्ष मुथा हे सीए असोसिएशनच्या नगर शाखेचे अध्यक्ष आहेत. अन्य धार्मिक संस्थांवरही ते कार्यरत आहेत.
या वेळी नवे अध्यक्ष बोरा यांनी ज्येष्ठ संचालक हस्तिमल मुनोत यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेच्या परंपरेला साजेसे काम करण्याचे आश्वासन दिले. नव्या पदाधिका-यांच्या निवडीनंतर बँकेचे ज्येष्ठ संचालक हस्तिमल मुनोत यांच्या हस्ते परदेशी व या पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला. मावळते अध्यक्ष मोहन बरमेचा व उपाध्यक्ष सुभाष बायड यांच्या कार्याचाही या वेळी गौरव करून त्यांचा सत्कार करण्यात आला. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश कटारिया यांच्यासह सर्व संचालक या वेळी उपस्थित होते. निवडीनंतर नव्या पदाधिका-यांच्या समर्थकांनी बँकेच्या आवारात ढोलताशा व फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा