रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या मृत्यूप्रकरणात ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. शशिकांत वारिशे यांचा जेथे खून करण्यात आला, त्या भागातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद कसे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच लोकांवर जबाब देऊ नये म्हणून दबाव टाकला जात आहे. वारिशे यांची राजकीय हत्या आहे, असेही राऊत म्हणाले आहेत. ते रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा >> सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाची मागणी फेटाळली, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्ही स्पष्ट सांगितलं…”

Kerala Double Murder
जादूटोण्याच्या संशयातून पाच वर्षांत संपूर्ण कुटुंब संपवलं; जामीनावर बाहेर आलेल्या आरोपीचं कृत्य
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Former Khanpur legislator Kunwar Pranav Singh Champion.
भाजपाच्या माजी आमदाराला अटक, अपक्ष आमदाराला मारहाण केल्याप्रकरणी कारवाई
uddhav thackeray loksatta news
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊत यांनी मांडली भूमिका
Sanjay Raut Slam BJP
Sanjay Raut : शिवसेनेत ‘उदय’ होणार यावर राऊत ठाम, चंद्राबाबू आणि नितीश कुमारांच्या पक्षाबद्दलही केला मोठा दावा; म्हणाले, “यांच्या तोंडाला रक्त…”
Tahawwur Hussain Rana extradited to India
२६/११ हल्ल्यापूर्वी १५ दिवस तहव्वूर राणा मुंबईत; हेडलीच्या दोन ईमेलने कटातील सहभागाचा उलगडा
ats arrested accused for forging Aadhaar and pan cards for Bangladeshi infiltrators
बांगलादेशी घुसखोरांना आधारकार्ड, पॅनकार्ड बनवून देणाऱ्यांना एटीएसकडून अटक, तीन बांगलादेशी नागरिकांसह सात जणांना अटक
Sanjay raut on balasaheb thackeray
Sanjay Raut : “…तर वीर सावरकरांचाही गौरव ठरेल”, बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न देण्याच्या मागणीवरून संजय राऊतांचं विधान चर्चेत!

हा तपास स्वतंत्रपणे होईल का? याबाबत मला शंका

“कोकणातील एका तरुण पत्रकाराला मारण्यात आले. हे आपल्या सर्वांसाठीच धक्कादायक आहे. कोकणाने आपल्याला अनेक मोठे पत्रकार दिले. महाराष्ट्राच्या भूमीत एका तरुण पत्रकाराची भूमिका पडत नाही म्हणून त्याला गाडीखाली मारले जात आहे. अगोदर अशा घटना बिहारमध्ये होत होत्या. त्यामुळे आपण महाराष्ट्राचा बिहार झाला आहे का? असे म्हणायचो. आता बिहारला म्हटलं जातंय तुमचा महाराष्ट्र झाला आहे का? पत्रकार वारिशे यांची हत्या साधी नाही. कोकणातील काही प्रकल्पांच्या बाबतीत वेगळे जनमत असू शकते. ही लोकशाही आहे. मात्र काय हवं आणि काय नको हे लोकच ठरवतात. मात्र लोकांची भूमिका मांडणारा एक पत्रकार मारला जातो. त्याच्यामागे कोण आहे, त्याचा तपास करावा. हा तपास स्वतंत्रपणे होईल का? याबाबत मला शंका आहे,” असे संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा >> शिवसेना सत्तासंघर्ष : सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी नियमितपणे सुनावणी; आज काय घडलं?

…यातूनच ही हत्या झाली आहे

“मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याबाबत सांगितले आहे. नाणार प्रकल्पाबाबत शशिकांत वारिशे सातत्याने लिहित होता. यातूनच ही हत्या झाली आहे. या प्रकल्पाच्या आसपास जे जमीनदार आहेत, वारिशे यांच्या हत्येमागे याच जमीनदारांचे काही हितसंबंध आहेत का?” असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.

हेही वाचा >> Chetan Sharma Resignation: चेतन शर्मांची गच्छंती! वादग्रस्त Video क्लिप भोवली, BCCIची मोठी कारवाई

कर्मचाऱ्यांवर जबाब देऊ नये म्हणून दबाव

“संशयित मारेकरी तुरुंगात आहे. त्याचे लागेबांधे नेमके कोणत्या पक्षाशी, सत्ताधाऱ्यांशी होते हा एक तपासाचा मुद्दा आहे. या हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ११ अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन केली आहे. मी शशिकांत वारिशे खून प्रकरणातील एफआरआय वाचली आहे. वारिशे यांचा खून झाला, त्या पेट्रोल पंपाच्या आसपासचे तीनही सीसीटीव्ही एकाच वेळी बंद कसे? त्या भागात तीन ते चार सीसीटीव्ही होते. मात्र त्याचे फुटेज मिळत नाहीये. पेट्रोल पंपावर आठ कर्मचारी होते. त्या आठही कर्मचाऱ्यांवर जबाब देऊ नये म्हणून दबाव टाकला जात आहे,” असा गंभीर आरोप राऊत यांनी केला.

Story img Loader