या देशामध्ये न्याययंत्रणा सर्वोच्च आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे. त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार अभिनेता संजय दत्त याने शिक्षा भोगली पाहिजे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. न्यायालयाने संजय दत्त याला शिक्षेतून सवलत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याकडे लक्ष वेधले असता अण्णा हजारे म्हणाले, आपल्या देशामध्ये न्याययंत्रणा सर्वोच्च आहे. त्यामुळे एकदा न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर त्याविषयी कोणी भाष्य करू नये.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay dutt has undergo punishment anna hajare