राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. तीन आठवड्यांपूर्वी पक्षात मोठी फूट पडली. पक्षातील वरिष्ठ नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांचा मोठा गट घेऊन महायुतीत प्रवेश केला आहे. तसेच अजित पवार गटाने आपणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा केला आहे. महायुतीत प्रवेश केल्यानंतर अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत. तर राष्ट्रवादीच्या इतर आठ आमदारांना मंत्रीपदं देण्यात आली आहेत. अजित पवारांच्या गटातील आमदारांची संख्या ही ३० पेक्षा जास्त आहे. तर उर्वरित १५ ते २० आमदार शरद पवारांच्या गटात आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा दुसरा गटही महायुतीत जाईल, असं बोललं जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील अशाच प्रकारचं वक्तव्य अलिकडे केलं होतं.

दरम्यान, शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय गायकवाड यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना राजकारणात काहीही होऊ शकतं, असं वक्तव्य केलं आहे. गायकवाड यांनी विधीमंडळाबाहेर टीव्ही ९ मराठीशी बातचित केली. यावेळी संजय गायकवाड यांना प्रश्न विचारण्यात आला की, राष्ट्रवादीचा दुसरा गट महायुतीत येईल का? त्यावर आमदार गायकवाड म्हणाले, राजकारणात भविष्यवाणी करणं योग्य नाही. राजकारणात काहीही होऊ शकतं, हेसुद्धा तितकंच खरं आहे, याला इतिहास साक्षी आहे.

Jayant patil Jitendra patil
जयंत पाटील यांचा प्रचार करणार नाही – जितेंद्र पाटील; काँग्रेसच्या बळकावलेल्या इमारतीवरून वाद
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Baba Siddiqui murder, Baba Siddiqui NC,
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येने राष्ट्रवादीला धक्का
Sayaji Shinde Join Ajit Pawar NCP
Sayaji Shinde : अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्येच का प्रवेश केला? सयाजी शिंदे म्हणाले, “मला या पक्षाची स्ट्रॅटेजी…”
ajit pawar
उमेदवारांच्या पोकळीमुळे ‘पलीकडे’ इच्छुकांना निमंत्रण – अजित पवार
What Supriya Sule Said About Rohit Pawar ?
Supriya Sule : “रोहित पवार जर मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी शरद पवारांचा वारसा..”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य चर्चेत
What Supriya Sule Said?
Supriya Sule : “देवेंद्र फडणवीस यांचं हातात बंदूक घेतलेलं पोस्टर, ही मिर्झापूर सीरिज..” सुप्रिया सुळेंचा सवाल
D Raja, Nitin Gadkari, CPI leader D Raja,
भाकप नेते डी. राजा म्हणतात, नितीन गडकरी चांगले व्यक्ती…

आमदार संजय गायकवाड म्हणाले, राजकारणात अनपेक्षित घडामोडी घडल्या आहेत. जे विचार कधी एकत्र येऊ शकत नव्हते असे पक्ष अलिकडच्या काळात एकत्र आल्याचं आपण पाहिलं आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र आल्याचं आपण पाहिलं. त्यामुळे शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र आले तर नवल वाटणार नाही.

दरम्यान, संजय गायकवाड यांनी यावेळी विरोधी पक्षांवरही टीका केली. आमदार गायकवाड म्हणाले, अजूनपर्यंत विरोधी पक्ष त्यांचा नेता निवडू शकले नाहीत, हे विरोधी पक्षाचं प्रचंड मोठं अपयश आहे. आज विधानसभेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. परंतु अजूनही विरोधकांना त्यांचा गटनेता निवडता आलेला नाही. कारण त्यांच्यात संपर्कच नाही. त्यांच्या कितीही बैठका होत असल्या तरी विरोधी पक्षनेतेपदावर त्यांचं एकमत झालेलं नाही.