राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपा आणि शिंदे गटातील नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केली होती. त्यांच्या वक्तव्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात आक्रमक भूमिका घेतली होती. पण, विधानसभेत बोलताना अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांकडून घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे.

शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. “छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षकाबरोबर धर्मवीर आहेत. धर्मासाठी आणि देशासाठी लढणारा राजा आहे. ज्यांनी मरण पत्करलं पण, धर्म सोडला नाही. त्यामुळे कोण्या चोमड्याने धर्मवीर आहेत का नाहीत, हा शहाणपणा शिकवण्याची गरज नाही,” असं संजय गायकवाडांनी म्हटलं आहे.

Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत
Brigadier Amitabh Jha acting UN peacekeeping force commander passes away
व्यक्तिवेध : ब्रिगेडियर अमिताभ झा
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”
Satish Wagh murder case, Satish Wagh Wife ,
सतीश वाघ खून प्रकरणात पत्नी सामील, मारेकऱ्यांना पाच लाखांची सुपारी; पत्नी गजाआड

हेही वाचा : “अजित पवारांना पाकिस्तानात पाठवा”, संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर भाजपाच्या माजी आमदाराची मागणी

“आमचे वंशज शिवाजी महाराजांबरोबर लढले आहेत. अमोल मिटकरी यांचा स्वराज्याशी काय संबंध आहे. आम्ही कोणाला काय म्हणायचं, हे शहाणपणा शिकवणारे मिटकरी कोण आहेत. एवढ्या वर्षापासून लोकं संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणत आहेत, तर ही प्रथा पुढं पण चालू राहणार आहे,” असं संजय गायकवाडांनी स्पष्ट केलं.

संभाजीराजेंची संतप्त प्रतिक्रिया

अजित पवारांच्या विधानावर संभाजीराजे छत्रपती यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. या हिंदवी स्वराज्याचं रक्षण छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती ताराराणी बाईंसाहेब यांनी केलं. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते, हे निश्चित आहे. तसेच, छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचं सुद्धा रक्षक केलं, हे कोणीही नाकारू शकत नाही,” असं संभाजीराजेंनी सांगितलं.

हेही वाचा : मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, जे.पी.नड्डा यांचा आरोप

“संभाजी महाराज हे स्वराज्याचे आणि धर्माचे रक्षक तसेच धर्मवीर आहेत. अजित पवारांनी कोणत्या पुराव्याच्या आधारे हे विधान केलं, त्यांनी स्पष्टीकरण द्यावं. कोणत्याही बाबत अभ्यास केल्याशिवाय प्रतिक्रिया देऊ नये. अजित पवारांनी केलेलं वक्तव्य चुकीचं असून, अर्धसत्य बोलले आहेत. स्वराज्यरक्षक बोलले ते बरोबर आहे, पण धर्मवीर नव्हते हे विधान साफ चुकीचं आहे,” असं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं आहे.

आणखी वाचा – “सावरकर आणि गोळवलकरांच्या दृष्टीने संभाजीराजे हे स्त्रीलंपट…”, जितेंद्र आव्हाडांचं खळबळजनक ट्वीट

काय म्हणाले होते अजित पवार?

हिवाळी अधिवेशनात विधानसभेत अजित पवारांनी बोलताना म्हटलं की, “आपण छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख स्वराज्यरक्षक असा करतो. पण, त्यांना काही लोक धर्मवीर म्हणत आहेत. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. संभाजी महाराजांनी कधीही धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनीही हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती,” असं अजित पवार म्हणाले होते.

Story img Loader